तळवट बोरगाव
?तळवट बोरगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | ९.३८४३ चौ. किमी • ४६८ मी |
जवळचे शहर | गेवराई |
जिल्हा | बीड |
तालुका/के | गेवराई |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | १,८५९ (२०११) • १९८/किमी२ ९५१ ♂/♀ ८३.१२ % • ८१.९१ % • ६२.३१ % |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | तळवट बोरगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • जनगणना कोड • आरटीओ कोड | • 431127 • +०२४४७ • ५५९२२६ (२०११) • MH23 |
स्थान व विस्तार
हे गेवराई तालुक्यातील गाव असून या गावात येण्यासाठी बीड, गेवराई(राष्ट्रीय महामार्ग २११) मार्गावर असलेल्या पाडळशिंगी या गावाजवळून पाचेगाव नंतर १० किलोमीटर अंतरावर तळवट बोरगाव आहे. हे गाव गेवराई शहरापासून २५ कि.मी तर बीड या जिल्हा मुख्यालयापासून ३२ कि.मी. दूर आहे.[१]
इतिहास
या गावाला "गाडे घोलपाचे बोरगाव" म्हणूनही ओळखले जात असे. सुमारे ९० वर्षापूर्वी येथे पटकी या साथीच्या रोगाची तीव्र साथ आली होती. या गावचा छोटा बाजार सोमवार या दिवशी भरत असे.३ कि.मी दक्षिणला असलेल्या कुक्कडगाव येथे मोठा बाजार भरतो. येथिल दगडाचे बांधकाम असलेली प्राचीन विहीर किंवा स्थानिक भाषेत बारव प्रसिद्ध आहे. येथे साळवे, गाडे, घोलप, गायकवाड, भिसे, शिंदे ,राऊत, आडनावाचे लोक राहतात.
लोकसंख्या
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार एकूण ३९६ घरे आहेत. एकूण लोकसंख्या १८५९ असून पुरुष ९५३ तर स्त्रिया ९०६ आहेत. वयोगट ० ते ६ मधील बालकांचे एकूण गावाच्या लोकसंख्येच्या १३.७७% प्रमाण असून संख्या २५६ आहे. स्त्री-पुरुष प्रमाण १००० पुरुषामागे ९५१ स्त्री असून ते महाराष्ट्र राज्याच्या ९२९ या सरासरी प्रमाणापेक्षा अधिक आहे.
साक्षरता
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंब | ३९६ | ||
लोकसंख्या. | १८५९ | ९५३ | ९०६ |
मुले(० ते ६ ) | २५६ | १४६ | ११० |
अनु.जाती (लोकसंख्या) (१६.९४%) | ३१५ | १६० | १५५ |
अनु. जमाती | ० | ० | ० |
साक्षरता (टक्केवारी) | ७२.१८ % | ८१.९१ % | ६२.३१ % |
एकूण कामगार | १२७२ | ६७५ | ५९७ |
लोकजीवन
आहार
पोशाख
व्यवसाय
बाजारपेठ
परिवहन सुविधा
शैक्षणिक सुविधा
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तळवट बोरगाव
- बोरगाव हायस्कूल,तळवट बोरगाव