तरन तारन
तरन तारन ਤਰਨ ਤਾਰਨ ਸਾਹਿਬ | |
भारतामधील शहर | |
येथील एक ऐतिहासिक गुरूद्वारा | |
तरन तारन | |
देश | भारत |
राज्य | पंजाब |
जिल्हा | तरन तारन जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७४३ फूट (२२६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ६६८४७ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
तरन तारन साहिब (पंजाबी: ਤਰਨ ਤਾਰਨ ਸਾਹਿਬ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक शहर व तरन तारन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तरन तारन शहर पंजाबच्या वायव्य भागात अमृतसरच्या २ किमी दक्षिणेस वसले आहे. तारन तरनची स्थापना पाचवे शीख धर्मगुरू गुरू अर्जुनदेव ह्यांनी केली. तरन तारन शीख धर्माचे व शीख संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र असून भारताच्या फाळणीवेळी पंजाबातील बहुसंख्य शीख रहिवासी असलेल्या मोजक्या गावांपैकी ते एक होते.
१९८० च्या दशकात चालू असलेल्या खलिस्तान चळवळीचे तरन तारन केंद्र होते. सध्या तरन तारन एक कृषीप्रधान शहर आहे.
पठाणकोट ते गुजरात दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १५ तरन तारनमधून जातो. तसेच तरन तारन रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक असून येथून अनेक डेमू गाड्या सुटतात.
हे सुद्धा पहा
- तरन तारन (लोकसभा मतदारसंघ)