Jump to content

तमिळ भाषा

Tamil
தமிழ்
स्थानिक वापरभारत, श्रीलंकासिंगापूर, मॉरिशसकॅनडा, मलेशिया इथे कमीअधिक प्रमाणात, तसेच इतर देशांतील स्थलांतरित तमिळभाषकआंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार
लोकसंख्या ६,६०,००,००० (प्रथमभाषा)
बोलीभाषा सेन्तमिळ, कोन्गु, नेल्लै, मदुरै, चेन्नई इलन्कै
भाषाकुळ
द्राविडी
  • दाक्षिणात्य
    • तमिळ-कन्नड
      • तमिळ-मल्याळम
        • Tamil
लिपीतमिळ, वट्टेळुत्तु लिपी
ग्रंथ लिपी (प्राचीन)
भाषा संकेत
ISO ६३९-१ta
ISO ६३९-२tam
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி , तमिळ मोळि) ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाडु" (अर्थ : तमिळ राष्ट्र) तसेच पोंडेचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे (अर्थ: नवी चेरी) तसेच भारतातील ‘अभिजात भाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका (இலங்கை /इलङ्गै) आणि सिंगापूर (சிங்கப்பூர் /सिंगप्पूर्) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती न्यूनाधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही दैनंदिन वापरात आढळून येते.

तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमावर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख थायलंड आणि इजिप्त येथे सापडल तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. १५७८ मध्ये, पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनऱ्यांनी थंबीरन वनाक्कम नावाचे जुन्या तमिळ लिपीतील तमिळ प्रार्थना पुस्तक प्रकाशित केले, त्यामुळे तमिळ ही छापली आणि प्रकाशित होणारी पहिली भारतीय भाषा बनली.[]

२००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.

व्युत्पत्ती

तत्कालीन तमिळ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पाण्ड्य राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळ संमेलने म्हणजेच तमिळ संगम भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन, विकास करण्यासाठी पाण्ड्य राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळ संगम या शब्दातूनच तमिळ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.पहिल्या शतकात तोल्‌क्काप्पियम् हा तमिळ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.[] साउथवर्थ यानुसार तमिळ या शब्दाचा अर्थ स्वभाषा किंवा स्वव्याख्यान असा होतो. []

इतिहास

तंजावुर येथील बृहदेश्वराच्या देवतील प्राचीन तमिळ लिपीतील लेख.

भाषाशास्त्रज्ञ ब्रद्रीराजु कृष्णमूर्ति यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक आद्यभाषा किंवा आद्यद्राविड भाषेपासून विकसित झाली असावी. आद्य- द्रविडी भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या गोदावरी नदी खोरे प्रदेशात इ.स.पू. तिसऱ्या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडीच्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती दक्षिण भारतात होती असे सुचवितो.[] इतिहासावरून असे दिसून येते की, तमिळ भाषा २२ द्राविड भाषा यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळ रूढ झाली. इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळ संघटीत झाली.[] तमिळची लिपी ही त्या काळानंतर तमिळ-ब्राह्मी लिपीपासून विकसित करण्यात आली. तमिळ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. [] तमिळ विद्वानांनी तमिळ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे:

  • प्राचीन तमिळ (इ.स.पु.३००-इ.स.७००),
  • मध्ययुगीन तमिळ (इ.स.७००-इ.स.१६००) आणि
  • आधुनिक तमिळ (इ.स.१६००-वर्तमान).[]

बोली आणि लिपी

तमिळ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोङ्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील आणि सध्याची शहरी भाषा.) आणि इलङ्गै (श्रीलंका आणि अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी ) 1.39.96.23 ००:३२, २३ जुलै २०१५ (IST)

मराठी-तमिळ-इंग्रजी लिप्यंतरण

स्वर

मराठी आणि तमिळमध्ये एकसारखे स्वर आहेत.

मराठी वर्णाक्षर“प” सोबतआईपीए उच्चार"प्" सोबत उच्चारISO तमिळ वर्णाक्षर“प” सोबत
/ ə // pə /a
पा/ ɑ: // pɑ: /āபா
पि/ ɪ // pɪ /iபி
पी/ i: // pi: /īபீ
पु/ ʊ // pʊ /uபு
पू/ u: // pu: /ūபூ
----eபெ
पे/ e: // pe: /ēபே
पै/ ɛ: // pɛ: /aiபை
पो/ ο: // pο: /oபொ
----ōபோ
पौ/ ɔ: // pɔ: /auபௌ

व्यंजन

मराठी वर्णाक्षरISOतमिळ वर्णाक्षरISO
क, ख, ग, घka, kha , ga, ghaka
च, छca, chaca
ज, झja, jhaja
ट, ठ, ड, ढṭa, ṭha, ḍa, ḍhaṭa
त, थ, द, धta, tha, da, dhata
प, फ, ब, भpa, pha, ba, bhapa

संख्या

तामिळ संख्या आणि त्यांचे उच्चार

मराठी - तमिळ संख्या
संख्यामराठी अक्षरीमूळ तमिळ प्रणाली वर्तमान तमिळ प्रणाली अक्षरी उच्चार
शून्य0பூஜ்யம் पूज्यम्
एकஒன்று ओन्-रू 
दोनஇரண்டு इरण्डू 
तीनமூன்று मुन्-रू 
चारநான்கு नांगु 
पाचஐந்து अइन्दु 
सहाஆறு आरु 
सातஏழு एऴु
आठஎட்டு ऎट्टु
नऊஒன்பது ओन्पदु 
१० दहा ௧0 பத்து पत्तु
२० वीस௨௰ ௨0 இருபது इरूवदु
३० तीस ௩௰ ௩0 முப்பது मुप्पदु
४० चाळीस ௪௰ ௪0 நாற்பது नाऱप्पदु
५० पन्नास ௫௰ ௫0 ஐம்பது अम्बदु
६० साठ ௬௰ ௬0 அறுபது अरूबदु
७० सत्तर ௭௰ ௭0 எழுபது एलुबदु
८०ऐंशी௮௰ ௮0எண்பது एण्बदु
९०नव्वद௯௰ ௯0தொண்ணூறு तोण्णूरू
१००शंभर௧00நூறு नूरू
५००पाचशे௫௱ ௫00ஐநூறு ऐनूरू
१,०००एक हजार௧000ஆயிரம் आयिरम
१०,००० दहा हजार ௰௲ ௧0000 பத்தாயிரம் पत्तायिरम
१,००,००० एक लाख ௱௲ ௧00000 ஒரு லட்சம் ओरू लक्षम
१०,००,००० दहा लाख ௰௱௲ ௧000000 பத்து லட்சம் पत्तु लक्षम
१,००,००,००० एक कोटी ௱௱௲ ௧0000000 ஒரு கோடி ओरू कोडि
१०,००,००,००० दहा कोटी ௰௱௱௲ ௧00000000 பத்து கோடி पत्तु कोडि
१,००,००,००,००० एक अब्ज ௱௱௱௲ ௧000000000 நிகற்புதம் निकऱपुदम

मराठी-तमिळ-भाषांतर व्यवहारोपयोगी उदाहरणे

  • नमस्कार - वणक्कम्
  • मी कार्तिक - नां कार्तिक
  • तू - नी
  • ये-वा.
  • यावे - वारुङ्गळ्
  • शुभ प्रभात - कालै वणक्कम्
  • शुभ संध्या - मालै वणक्कम्
  • स्वागतम् - नल्‌वरवु
  • धन्यवाद - नंड्री
  • धाकटा भाऊ - तंबी
  • थोरला भाऊ - अण्णन्
  • धाकटी बहिण - तङ्गै
  • थोरली बहिण - अक्का
  • आई - अम्मा
  • बाबा - अप्पा
  • फार आभारी - रोम्ब नंड्री
  • तू कसा आहेस? -नी एप्पडि इरुक्किऱाय?
  • तुम्ही कसे आहात? - नीङ्गळ् एप्पडि इरुक्किरींगळ्?
  • मी बरा आहे.- नान् नल्लाह इरुक्केन्.
  • ठीक - सरि
  • प्रत्यवाय नाही / हरकत नाही - परवायिल्लै / कोळप्पमिल्लै
  • अरे मित्रा- अडे नण्बा
  • मला तुझी खूप आठवण आली - उन्नै रोम्ब ञाबगप्पडुत्तिनेन्.
  • नवीन काय?- पुदुसा एन्न सेय्दि.
  • काय- एन्न.
  • काहीच नाही - ओण्णुमिल्लै.
  • जाऊन येतो - पोयिट्टु वरुगिरेन्.
  • मला रस्ता माहित नाही - एनक्कु वळि तेरियविल्लै.
  • मी रस्ता विसरलो - नान् वळियै मऱन्दुविट्टेन्.
  • मी तुम्हाला सहाय्य करू का? - नान् उङ्गळुक्कु उदवट्टुमा?
  • मला थोडी मदत कराल का? - एनक्कु कोञ्चम् उदवि सेय्वीर्हळा?
  • मुतारी/शौचालय कुठे आहे? - कळुवरै एङ्गे इरुक्कु?
  • औषधालय कुठे आहे? - मरुंदुक्कडै एङ्गे इरुक्कु?
  • सरळ जा मग उजवीकडे / डावीकडे वळा - नेराह पोङगळ्, अप्पुरम् वलदुपक्कम् / इडदुपक्कम् तिरुप्पुङ्गळ्.
  • मी जॉनला शोधतोय - नां जानै तेडुगिरेन्.
  • जॉन आहेत का? - जान् इरुक्कारा?
  • एक निमिष/मिनीट - ओरु निमिडम्
  • धीर धरा - इरुङ्गळ्.
  • हे केवढ्याला - इदु विलै एव्वळवु?
  • एवढं?- एव्वळो?
  • क्षमा करा - मन्निक्कणुङ्ग.
  • माझ्यासोबत या - एन्कूड वाङ्ग.
  • साहेब - ऐया.
  • कृपया - तयवु सेयिदु
  • तिथे जा - अङ्गु पो
  • इथे ये - इङ्गु वा
  • किती वाजले? - मणि एन्न?
  • आज तारीख काय? - इन्निक्कु एन्न तेयदि?
  • खरंच ! ( रियली) - ओ! अप्पडिया!

भारतातील तमिळभाषक

दक्षिण भारत आणि श्रीलंकेतील तमिळ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).

भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]

अनुक्रमराज्यतमिळभाषकांची लोकसंख्या
भारत६,०८,९३,७३१
तमिळनाडू५,५८,७७,४४१
कर्नाटक१८,८६,७६५
पुदुच्चेरी८,६२,१९८
आंध्र प्रदेश७,६९,७२१
केरळ५,९८,६१८
महाराष्ट्र५,३२,८३२
दिल्ली९२,७९८
अंदमान आणि निकोबार६३,५३८
गुजरात३५,४७०
१०मध्य प्रदेश२४,१३९
११पश्चिम बंगाल२४,०५३
१२उत्तर प्रदेश१६,६२०
१३झारखंड१३,४७३
१४छत्तीसगढ१२,५००
१५पंजाब१२,१७९
१६राजस्थान११,३०१
१७हरियाणा१०,५७२
१८जम्मू आणि काश्मीर९,१२९
१९गोवा७,९५१
२०ओडिशा७,३६१
२१चंदीगड५,७६४
२२आसाम५,३३१
२३उत्तराखंड२,५४७
२४मणिपूर२,३८३
२५अरुणाचल प्रदेश१,६४७
२६नागालॅंड१,५९२
२७त्रिपुरा१,२८०
२८हिमाचल प्रदेश१,२१६
२९मेघालय९२८
३०दादरा आणि नगर हवेली६६१
३१सिक्किम४८७
३२मिझोरम४४४
३३लक्षद्वीप४४३
३४दमण आणि दीव३४८

शब्दसंग्रह/शब्दसूची

तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने द्राविडीयन भाषा-कुळातील आहे, आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो. भाषा शुद्धीकरणारात संस्कृत मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो. इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे कन्नड, तेलुगू, आणि मल्याळम ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा, वाक्यरचनेचा तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते, ज्यामुळे ह्या भाषांतील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषा.

अधिकृत दर्जा आणि इतर

तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि अंदमान आणि निकोबार येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २२ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती श्रीलंका आणि सिंगापुर या देशातही एक अधिकृत भाषा असून, मलेशियातील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Tamil saw its first book in 1578". २०२४-०६-०१ रोजी पाहिले.
  2. ^ Zvelebil 1992, p. x
  3. ^ Southworth 1998, pp. 129–132
  4. ^ Southworth 2005, pp. 249–250
  5. ^ Southworth 2005, pp. 250–251
  6. ^ Sivathamby, K (December 1974) Early South Indian Society and Economy: The Tinai Concept, Social Scientist, Vol.3 No.5 Dec 1974
  7. ^ Lehmann 1998, p. 75

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे