तमिळ ईलम
तामिळ इलम हे एक प्रस्तावित स्वतंत्र राज्य आहे जे श्रीलंकेत पांगलेले तामिळ लोकं श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला निर्माण करू इच्छितात. इलम हे नाव श्रीलंकेच्या प्राचीन तामिळ नावावरून आले आहे. जरी तामिळ इलममध्ये श्रीलंकन तमिळ लोकांच्या पारंपारिक जन्मभुमींचा समावेश आहे, तरी त्याला जागतिक देशांद्वारे अधिकृत दर्जा किंवा मान्यता नाही. श्रीलंकेच्या नागरीयुद्धादरम्यान १९९०-२००० च्या दशकातील बहुतांश काळ ईशान्येतील मोठा भाग लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होता.