तडाको उराता
तडाको उराता | |
---|---|
जन्म | 宇良田 唯子 ३ मे १८७३ उशिबुका |
मृत्यू | १८ जून १९३६ (वय ६३) तोक्यो, जपान |
टोपणनावे | उराता तडा, युई नाकामुरा |
पेशा | वैद्य |
तडाको उराता (宇良田唯子) या एक जपानी वैद्य (डॉक्टर) होत्या. त्यांनी डोळा व त्याला होणाऱ्या रोगांचा अभ्यास जर्मनी मध्ये केला होता. त्यांचा जन्म ३ मे १८७३ रोजी झाला होता. त्यांचा मृत्यु १८ जून १९३६ रोजी झाला. त्या आणि त्यांचा नवरा मिळून १९१२ ते १९३२ या काळात चीनमधील त्यांजिन येथे क्लिनिक चालवत होते.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
उराता यांचा जन्म उशिबुका (सध्याचे अमाकुसा शहराचा भाग) येथे झाला होता, त्या लेखक आणि व्यापारी उराता गेन्शो यांच्या मुलगी आहेत. त्यांनी कुमामोटो येथे फार्मासिस्ट म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर १८९९ मध्ये तोक्यो येथे वैद्यकीय परवाना मिळवला. त्यांनी किटासाटो शिबासाबुरोच्या इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ इन्फेक्शियस डिसीजमध्ये संसर्गजन्य रोगांचा अभ्यास केला.[१] स.न. १९०३ मध्ये त्यांनी नेत्ररोगशास्त्रात पुढील शिक्षण घेण्यासाठी त्या जर्मनीला गेल्या. परदेशात प्रगत पदवी मिळवणाऱ्या जपानी महिलांच्या पहिल्या गटांपैकी त्या एक होत्या.[२][३][४]
उराता यांनी नवजात गोनोकोकल नेत्रश्लेष्मलाशोथ प्रतिबंधक प्रबंधासह स.न. १९०५ मध्ये मारबर्ग विद्यापीठात डॉक्टरेट पदवी मिळवली.[५] त्यांचे डिसर्टेशन संशोधन "प्रायोगिक संशोधन उबर" हा लेख "सो कॉल्ड क्रेडस् ड्रॉप" नावाने प्रकाशित झाला होता.[६] स.न. २०१६ मध्ये हेल्मुट सीस यांनी नमूद केले, "उराता ही केवळ पहिली महिला जपानीच नव्हती, तर मारबर्ग विद्यापीठात वैद्यकीय डॉक्टरची पदवी मिळवणारी पहिली महिला देखील होती."[७][८] हा मैलाचा दगड आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक जर्नल्स आणि दैनिक वर्तमानपत्रांमध्ये नोंदवला गेला.[९][१०]
कारकीर्द
उराता १९०६ मध्ये जपानला परतल्या. त्यानंतर त्यांनी तोक्योमध्ये नेत्ररोगशास्त्रात प्रॅक्टिस सुरू केली. नंतर त्यांनी त्यांचा नवऱ्याबरोबर टिॅंजिन, चीन भागात एक दवाखाना १९१२ पासून १९३२ पर्यंत चालवला.[१] त्या जपानी वुमेन्स मेडिकल असोसिएशनच्या अधिकारी होत्या. त्यांना जपानी सरकारकडून मेडिसिनच्या प्राध्यापकाची मानद पदवी बहाल केली होती.[११]
वैयक्तिक जीवन आणि वारसा
उरता यांचे तरुणीपणीच लग्न झाले होते. परंतु त्यांचे शिकण्यासाठी लग्न तोडले. त्यांनी १९११ मध्ये नाकामुरा त्सुनेसाबुरो या सहकारी डॉक्टरशी लग्न केले. स.न. १९३६ मध्ये तोक्योमध्ये नाकामुरा त्सुनेसाबुरो मरण पावले.[१] १९९२ मध्ये त्यांना कुमामोटो प्रीफेक्चरसाठी "पर्सन ऑफ कल्चरल मेरिट" पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या मुळ गावी उराता यांचे स्मारक आहे.[१२]
संदर्भ
- ^ a b c IBBO-International Biography and Bibliography of Ophthalmologists and Visual Scientist (A-Z) (इंग्रजी भाषेत). Wayenborgh Publishing. 2018-11-30. p. 414. ISBN 978-90-6299-896-8.
- ^ Fujimoto, Hiro (2020-04-02). "Women, missionaries, and medical professions: the history of overseas female students in Meiji Japan". Japan Forum. 32 (2): 185–208. doi:10.1080/09555803.2018.1516688. ISSN 0955-5803.
- ^ Ogawa, Mariko (September 2017). "History of Women's Participation in STEM Fields in Japan". Asian Women. 33 (3): 65–85. doi:10.14431/aw.2017.09.33.3.65.
- ^ "Interview with Aeka Ishihara". Keio University. 2021-11-14 रोजी पाहिले.
- ^ "Japanese Lady Doctor". Evening Express. 9 March 1905. p. 2. November 13, 2021 रोजी पाहिले – Welsh Newspapers, The National Library of Wales द्वारे.
- ^ Urata, Tada (1905). "Experimentelle Untersuchungen über den Wert des sogenannten Credéschen Tropfens". Ophthalmologica (english भाषेत). 13 (4): 335–346. doi:10.1159/000290336. ISSN 0030-3755.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Sies, Helmut (December 2016). "German-Japanese relationships in biochemistry: a personal perspective". Nagoya Journal of Medical Science. 78 (4): 335–347. doi:10.18999/nagjms.78.4.335. ISSN 0027-7622. PMC 5159459. PMID 28008189.
- ^ Kim, Hoi-eun (2014-07-31). Doctors of Empire: Medical and Cultural Encounters between Imperial Germany and Meiji Japan (इंग्रजी भाषेत). University of Toronto Press. pp. 190, note 47. ISBN 978-1-4426-6048-9.
- ^ "Medical News". Physician and Surgeon. 28: 426. September 1906.
- ^ "Honors for Japanese Co-Ed". The Miami News. 1905-03-28. p. 1. 2021-11-14 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "News and Notes: A Japanese Woman Professor of Medicine". American Medicine. 12: 176. June 1906.
- ^ "Monument Urata Tada". Ushibuka Tour Guide. 2021-11-13 रोजी पाहिले.