तंट्या भिल्ल
मामा तंट्या भिल्ल | |
---|---|
मध्य भारतातील जाती व आदिवासी (१९१६) चे चित्र | |
जन्म: | १८४२ पूर्व निमाड़, मध्यप्रदेश |
मृत्यू: | १८९० जबलपूर, मध्यप्रदेश |
चळवळ: | १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध |
१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरशः लोकनायक होता.ब्रिटिश राजसत्तेच्या काळात निजाम, होळकर, शिंदे व इतर संस्थानिक ब्रिटिश सत्ते बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता ११ वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी-किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता . तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले होते व त्याच बरोबर होळकरांनी सुद्धा वेगळे बक्षीस ठेवले होते. याच्या वरूनच तंट्या भिल्लाने किती त्रास ब्रिटिश सत्तेला दिला होता हे लक्षात येते. त्याच बरोबर ब्रिटिशांनी तंट्याला पकडण्यासाठी ‘तंट्या पोलीस’ नावाचे स्वतंत्र पोलीस दल स्थापन केले. गावागावात तंबु उभे करून पोलीस चौक्या उभ्या केल्या होत्या. मालगुजार व सावकारांना मोफत शास्त्रे वाटली होती तरीही हा वीर ११ वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन डोंगरदऱ्यात तळपत होता.
भारतीय स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाप्रमाणे या आदिवासी भिल्ल क्रांतिकारकांचा इतिहास ही महत्त्वाचा आहे जो बाकीच्या क्रांतिकारकांच्या प्रमाणे सगळ्यांच्या पुढे आला नाही. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळो कि पळो करणारे हे क्रांतिकारक दुर्लक्षितच राहिले. व त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून बघितले.
भारतीय रॉबिनहुड क्रांतिकारक तंट्याभील यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन 🙏
- रॉबिनहुड_टंट्याभील
- सुनीता बुरसे[१]
बालपण
मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होते.
पुस्तके
- आदिवासी वीर तंट्या भिल्ल (लेखक - बाबा भांड)
- तंट्या भिल्ल (अनुवादित, मूळ इंग्रजी, Jananayak Tantya Bhil and the Present Tribal Movrment, लेखक बाबा भांड; मराठी अनुवाद - विश्वनाथ देशपांडे)
- तंट्या भिल्ल (विलास वाघ)
- तंट्या भिल्ल याचे जीवन - लेखक - चारुचंद्र मुखर्जी
- ^ भांड, बाबा. "महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. 2016-04-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.