ढोकळा
ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे.[१] हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो.[२]
ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो.[३] दोन्ही नावे वापरली जातात.
तांदूळ आणि चण्याची डाळ एका ठराविक प्रमाणात (ठराविक चव आणि पोत येण्यासाठी) रात्रभर भिजवले जातात. हे मिश्रण दळून चार ते पाच तास किंवा रात्रभर आंबण्यासाठी ऊबदार ठिकाणी ठेवले जाते. त्यात थोडा तिखटपणा येण्यासाठी थोडी मिरचीची पूड, कोथिंबीर, आलं आणि बेकिंग सोडा घातला जातो. हे आंबवलेले मिश्रण मग एका पसरट भांड्यात ओतून १५ मिनिटे वाफवले जाते आणि त्याचे तुकडे कापले जातात. या कापलेल्या तुकड्याना गरम तेल आणि मोहरीची फोडणी दिली जाते. हिंग आणि गरम तेलात तळलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या जातात किंवा सम प्रमाणात पाणी आणि साखर तेलात टाकली जाते. हे तुकडे मग भांड्यातून काढले जातात. कधी कधी ते गरम तेलात जिऱ्याची फोडणी करून त्यात परतले जातात. बरेचदा ढोकळा तळलेल्या मिरच्या आणि कोथिंबिरीच्या चटणीसोबत वाढला जातो. ते कोथिंबिरीने अथवा कधीतरी किसलेले खोबरे वापरून सजविले जातात.[४]
आंबवलेले मिश्रण वाफवण्यासाठी अजून एक पद्धत वापरली जाते, ज्यात मिश्रण पसरट भांड्यात ओतून ते भांडे अजून एका वाफ बाहेर न जाऊ देणाऱ्या भांड्यात ठेवले जाते. ढोकळा वाफवताना वाफेचे पाणी त्यावर पडू नये म्हणून झाकणाला पातळ कापड बांधले जाते.
ढोकळ्याचे प्रकार :[५] आंबट (खट्टा) ढोकळा रसिया ढोकळा खांडवी तूर डाळीचा ढोकळा रवा ढोकळा हिरव्या वाटाण्याचा ढोकळा वेगवेगळ्या डाळींचा ढोकळा
खमण हा असाच काहीसा डाळीच्या पिठाचा पदार्थ तर ढोकळा हा तांदूळ आणि चणाडाळ वापरून बनवला जातो. खमण साठी फक्त चणाडाळ वापरली जाते.खमण रंगाने रंगाने थोडा फिकट आणि ढोकळ्यापेक्षा जास्त मऊ असतो. ढोकळा बनवताना अगदी थोड्या प्रमाणात सोडा वापरतात. पण खमण अधिक मऊ आणि जाळीदार होण्यासाठी जास्त बेकिंग सोडा वापरला जातो.
टीप:- सॉस किवा चिंचेची चटणी सोबत खावे.
वैकल्पिक कृती
साहित्य :
- १ कप बेसनपीठ
- १/२ ते पाऊण कप आंबट ताक
- १ मोठा चमचा तेल
- १/२ tsp खाण्याचा सोडा
- मीठ व साखर चवीनुसार
- १० मिरच्या उभे काप केलेल्या
- २ कप पाणी
- १०-१५ कढीपत्ता
- १/२ tsp मोहरी
- १/२ tsp जिरे
- १ tsp तीळ
- २ tsp कापलेली कोथिंबीर
- २ मोठे चमचे किसलेला ओला नारळ
- १ मूठभर हिंग
- १ चमचा इनो पावडर
एका मोठ्या वाटीमध्ये बेसनपीठ, आंबट ताक, खाण्याचा सोडा, मीठ चवीनुसार, २ कप पाणी चमच्याने गुठळ्या न होता एकत्रित करून घ्यावे.
आता त्यामध्ये आर्धा चमचा इनो पावडर घालून १ मिनिटभर फेटून घ्यावे. तुमचे मिश्रण दुप्पट होईल. ढोकळा बनवण्याच्या थाळीमध्ये थोडे तेल टाका व ते पसरून घ्यावे. मिश्रण त्यामध्ये टाकावे, परंतु ते मिश्रण थालीच्या अर्धे असावे याची काळजी घ्यावी. ढोकळा बनवण्याच्या पात्रामध्ये १ स्टँड टाकावे त्या वर थाळी ठेवून १०-१५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. १०-१५ मिनिटानंतर त्यामध्ये चाकू घालून पाहावे जर मिश्रण चाकुला चिकटले, तर आणखी ३-४ मिनिट मंद आचेवर ठेवावे. जर मिश्रण चाकुला चिकटले नाही तर तुमचा खमंग ढोकळा तयार झाला. गॅस बंद करावा व थाळी पत्रातून काढून घ्यावी. चाकूने तुमच्या आवडीनुसार काप करावे. तुमचा खमंग ढोकळा तयार आहे.
ढोकलाचे प्रकार
ढोकळाचे काही लोकप्रिय प्रकारः
खट्टा ढोकळा
रसिया ढोकळा
खांडवी ढोकळा
चीझ ढोकळा
तूर डाळ ढोकळा
सॅंडविच ढोकळा
रवा ढोकळा
मिसळलेली डाळ ढोकळा
हिरवे वाटाणे ढोकळा
मीठा ढोकळा
बेसन ढोकळा
खमण ढोकळा
खमण हे असेच हरभरा पीठ आधारित अन्न आहे. ढोकळा तांदूळ आणि चणापासून बनविला जातो, तर खमण फक्त चणापासून बनविला जातो. खमण सामान्यत: रंगात फिकट आणि ढोकळापेक्षा मऊ असते. ढोकळा बनवण्यासाठी, बेकिंग सोडाचा थोडासा वापर केला जातो, तर खमानला अधिक बेकिंग सोडा टाकला जातो ज्यामुळे तो अधिक फ्लफी, स्पंजयुक्त आणि सच्छिद्र होते.
इडाडा हे ढोकळाचे आणखी एक प्रकार आहे, जी काळ्या हरभरा डाळीचा वापर करून तयार केली जाते, ज्याला चणाऐवजी उडीद डाळ देखील म्हणतात. मध्य प्रदेशसह भारतातील पश्चिमेकडील भागात न्याहारी म्हणून किंवा नाश्ता म्हणून ढोकळाचा सामान्य वापर केला जातो.
संदर्भ
- ^ "Delicious dhoklas".
- ^ "Utilization of tropical foods".
- ^ "Khaman Dhokla from Gujarat".
- ^ "Dhokla Recipe-How to Make Soft and Spongy Dhokla-Khaman Dhokla-Besan Dhokla".
- ^ "9 Different Types Of Mouth Watering Dhoklas That Must Get To Your "To-Eat" List". 2018-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-11 रोजी पाहिले.