ढमढेरे
ढमढेरे हे मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध घराणे आहे. तळेगाव ढमढेरे हे या घराण्याचे मूळ ठिकाण आहे. छत्रपती संभाजी महाराज ते पेशवाई कालखंडापर्यंत या घराण्याने उत्तम कामगिरी बजावली आहे. ढमढेरे हे पेशव्यांच्या हुजुरात सैन्यातील प्रमुख सरदारांपैकी एक होते.