Jump to content

ढगफुटी

काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.[१]

गुणधर्म

सर्वसाधारणपणे, प्रतितास १॰॰ मिलीमीटर (३.९ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते.

नोंदी

वेगवेगळ्या ढगफुटींची नोंद [२]
कालावधीपर्जन्यमानठिकाणदिनांक
१ मिनिट१.९ इंच (४८.२६ मिमी)लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत६ ऑगस्ट, २०१०
१ मिनिट१.५ इंच (३८.१० मिमी)बारोट, हिमाचल प्रदेश, भारत२६ नोव्हेंबर, १९७०
५ मिनिटे२.४३ इंच (६१.७२ मिमी)पोर्ट बेल्स, पनामा२९ नोव्हेंबर, १९११
१५ मिनिटे७.८ इंच (१९८.१२ मिमी)प्लंब पॉइंट, जमैका१२ मे, १९१६
२० मिनिटे८.१ इंच (२०५.७४ मिमी)कर्टिया-डी-अर्गेस, रोमानिया७ जुलै, १९४७
४० मिनिटे९.२५ इंच (२३४.९५ मिमी)गुइना, व्हर्जीनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने२४ ऑगस्ट, १९०६

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "समजून घ्या : ढगफुटी म्हणजे काय? ती कशी होते?; जगातील सर्वात मोठी ढगफुटी भारतात कधी, कुठे झालेली?".
  2. ^ आइसलॅंडनेट.कॉम - ढगफुटीची माहिती (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत