Jump to content

डोव्हरची सामुद्रधुनी

डोव्हरच्या सामुद्रधुनीचे स्थान
फ्रान्समधून डोव्हरच्या सामुद्रधुनीपलीकडील इंग्लंडच्या किनाऱ्याचे दृष्य

डोव्हरची सामुद्रधुनी (इंग्लिश: Strait of Dover; फ्रेंच: Pas de Calais) ही इंग्लिश खाडीच्या सर्वात अरूंद भागातील एक सामुद्रधुनी आहे. इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हरफ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील कॅले ही दोन गावे डोव्हरच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर केवळ ३४ किमी अंतरावर वसलेली आहेत. डोव्हरची सामुद्रधुनी हा सागरी वाहातुकीसाठी जगातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.