Jump to content

डोळा

शरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशील अवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. हे प्रकाशला संसूचित करून त्याला तंत्रिका कोशिका द्वारे विद्युत-रासायनिक संवेदों में बदलते. उच्चस्तरीय जंतूचे डोळे एका जटिल प्रकाशीय तंत्र जो जवळपासच्या वातावरणातून प्रकाश एकत्र करताे आणि मध्यपटा द्वारे डोळ्यात प्रवेश करनारे प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करते. या प्रकाशाला लेंसच्या सहायता ने योग्य स्थान पर केंद्रित करताे.(ज्या द्वारे प्रतिबिम्ब बनते); या प्रतिबिम्बला विद्युत संकेत बदलते. या संकेतांना तंत्रिका कोशिकांच्या माध्यमातून मस्तिष्क जवळ पाठवल्या जातात. []

आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच अत्यंत महत्त्वाच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे.

डोळ्यांचे रंग व वर्णन

डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.

नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.

त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.) संरचना

डोळ्याचे विभिन्न भाग अशा प्रकारे आहेत-

श्वेतपटल रक्तक दृष्टिपटल नेत्रश्लेष्मला (कंजंक्टिभा) स्वच्छमण्डल परितारिका पुतली पूर्वकाल कक्ष पश्च कक्ष नेत्रोद नेत्रकाचाभ द्रव

पुस्तके

डोळ्यांचे आरोग्य या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :

  • चष्मा व नेत्ररोग चिकित्सा (डॉ. जयनारायण जैस्वाल)
  • डोळ्यांची निगा (डॉ. छाया कुलकर्णी)
  • नेत्र स्वास्थ्य साधना (सदाशिव निंबाळकर)
  • पाहू आनंदे (डॉ. तेजस्विनी आणि डॉ. प्रसाद वाळिंबे)
मानवी डोळा

आपल्या डोळ्यांचा आकार कधी बदलत नही.

संदर्भ

  1. ^ "डोळा". विकासपिडिया. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे