डोपामिन
डोपामिन हे आपल्या मेंदूतील एक रसायन ( nurotransmitor ) आहे . कोणतीही नविन व आनंददायी गोष्ट केली की ते डोक्यात स्त्रवलं जातं .
डोपामिन आणि व्यसने
व्यसनी पदार्थाच्या सेवनाने डोपामिन स्त्रवलं जातं . ती आनंदाची भावना वारंवार मिळवण्यासाठी आमली पदार्थांचं सतत सेवन करून लोक व्यसनी बनतात . मात्र सरणाऱ्या काळाबरोबर त्यातील नाविन्य कमी होतं आणि शरिरालाही त्या पदार्थांची सवय होते त्यामुळे तितकाच आनंद मिळवण्यासाठी जास्त पदार्थ घ्यावे लागतात .
विविध सामाजिक माध्यमे तयार होताना या रसायनाच्या परिणामांचा अभ्यास करतात . लोकांना जास्तीत जास्त डोपामिन मिळेल आणि त्यांचा वापर वाढेल यासाठी त्यांची अभ्यासपुर्व रचना केलेली असते .