Jump to content

डोई नांग नॉन

डोई नांग नॉन

डोई नांग नॉन (थाई: ดอย นาง นอน; "झोपलेल्या बाईचा पर्वत") थायलंडच्या चियांग राय प्रांतातील एक पर्वतरांग आहे. हे डैन लाओ पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात आहे. कार्स्टिक प्रकाराच्या या पर्वतांमध्ये असंख्य झरे आणि लेणी (गुहा) आहेत. यातील काही भाग थॉम लुआंग-खून नाम नांग नॉन फॉरेस्ट पार्क म्हणून प्रसिद्ध आहे.

भौगोलिक

दोई नांग नॉन चाइन्ग राय आणि मॅई साई दरम्यानच्या हायवेच्या पश्चिम बाजूला असलेल्या लांब डोंगराळ भागाचा समावेश आहे. या क्शेत्राचा मोठा भाग मे साई जिल्ह्यात आहे, म्यानमारच्या सीमेवर पोंग फीचा पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम पसरलेला आहे. पर्वत रांगेचे एक असामान्य वैशिष्ट्य आहे, जर एका विशिष्ट कोनातून पाहिले तर त्यात लांब केसांची स्त्री वाकल्यासारखी दिसते.

लेणी

या क्षेत्रात अनेक गुंफा आणि भूमिगत पाण्याचे झरे आहेत.

  • थाम लुआंग नांग नॉन डोई नांग नॉन रेंजमध्ये गुफेचे कॉम्प्लेक्स आहे. ती अनेक किलोमीटर पसरलेल्या शाखांपासून बनलेली गुहा आहे. यात असंख्य स्टॅलेक्टाईट्स आणि स्टॅगमेइट्स आहेत.
  • खून नाम नांग नॉन हा एक नैसर्गिक तलाव आहे ज्यामध्ये खडकावर पाणी वाहते. हे पाणी कल्पित महिलेच्या भूताचे अश्रू असल्याचे म्हणले जाते.