Jump to content

डोंबारी (पक्षी)

डोंबारी(पक्षी)

डोंबारी, भुरुळका चिमणी तथा वडीचिमणी (शास्त्रीय नाव:एरेमोप्टेरिक्स ग्रीसिया) हा महाराष्ट्रात आढळणारा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ॲश्बी क्राउन्ड स्पॅरो लार्क किंवा ब्लॅकबेलीड फिच लार्क अशी नावे आहेत.

माहिती

साधारण चिमणीएवढा(१३ सेमी) असलेल्या या पक्ष्याचा रंग वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोकं राखट रंगाचं तर चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो.नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळताजुळता असतो. याचे मुख्य अन्न कीटक, चतुर, भुंगे, अळ्या आणि गवताच्या बिया हे असते. या पक्ष्याचे घरटे माळावरच्या दगडाला खेटून तयार केलेली गवताच्या वाटीसारखे असते. या वाटीत मादी परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगांची अंडी घालते. हा पक्षी उंच आकाशात चढतो आणि पंख मिटवून सूर मारतो. म्हणून या पक्ष्याला डोंबारी हे नाव आहे. या पक्ष्याची मादी साधारण चिमणीसारखी दिसते परंतु हा पक्षी सहसा माणसाच्या घराजवळ येत नाही. चंडोल कुटुंबातले हे पक्षी जोड्यांनी किंवा छोट्या थाव्यांमध्ये राहतात. शेतीवाडीच्या आसपास राहत असल्याने यांना माणसांची बऱ्यापैकी सवय झालेली असते.

आरुणि (Redwinged Bush Lark)

हि चांडोलाची जात गोटेमाळावर किंवा काटेवनात दिसते. या पक्ष्याचं उड्डाण आणि गाणं प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा पहा

  • डोंबारी

बाह्य दुवे