Jump to content

डोंगर तुकाई

डोंगर तुकाई हा परळी वैजनाथ ते चांदापूर रस्त्यावर असलेला एक डोंगर आहे.त्याचे परळी वैजनाथपासूनचे अंतर सुमारे ७ किमी आहे. याची उंची साधारणतः १५०-१७५ फूट आहे. या डोंगरावर सुमारे ७०० वर्षे जुने श्री अंबा आरोग्यभवानी (तुळजाभवानी)चे मंदिर आहे. हे काळ्या पाषाणात बांधण्यात आले आहे.या मूर्तीच्या खाली भुयार आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे.

येथे नृसिंह सरस्वती यांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते. ते येथे सन १४२० मध्ये आले होते.या बाबतचा उल्लेख गुरुचरित्रात १४व्या अध्यायात ४५व्या ओवीत आला आहे. [ संदर्भ हवा ]