Jump to content

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[]

निकष

पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[]

  1. दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
  2. समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम
  3. अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.

स्वरूप

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • बाबासाहेब आंबेडकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार

संदर्भ

  1. ^ a b c "Welfare of SC/ST". www.delhi.gov.in. 2018-05-22 रोजी पाहिले.