डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक उच्च महाविद्यालय आहे.[१] हे महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[२]
पूर्वी याचे नाव विज्ञान महाविद्यालय असे होते. २०२३ मध्ये, या महाविद्यालयाचे संस्थापक आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावरून नामांतर करण्यात आले. १९९१ साली देशमुख यांनी महाविद्यालयाची स्थापना केली होती.[३] येथे २५ प्रकाराच्या विषयांचे अध्यापन चालते.
संदर्भ
- ^ "Vidnyan Mahavidyalaya, Sangola: Admission, Fees, Courses, Placements, Cutoff, Ranking". www.careers360.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
- ^ "List of Affiliated Colleges, bcud section, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur". www.sus.ac.in. 2021-12-29 रोजी पाहिले.
- ^ "Vidnyan Mahavidyalaya Sangola". vmssangola.org. 2021-12-29 रोजी पाहिले.