Jump to content

डेव्हिड बेकहॅम

डेव्हिड बेकहॅम
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावडेव्हिड रॉबर्ट जोसेफ बेकहॅम
जन्मदिनांक२ मे, १९७५ (1975-05-02) (वय: ४९)
जन्मस्थळलंडन, युनायटेड किंग्डम
उंची१.८३ मी (६ फु ० इं)
मैदानातील स्थानमिडफील्डर
तरूण कारकीर्द
टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.
ब्रिम्सडाउन रोव्हर्स
1991–1993मॅंचेस्टर युनायटेड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
1992–2003मॅंचेस्टर युनायटेड265(62)
1994–1995→ प्रेस्टन नॉर्थ एंड (उधार)5(2)
2003–2007रेआल माद्रिद116(13)
2007–2012लॉस एंजेल्स गॅलेक्सी98(18)
2009ए.सी. मिलान (उधार)18(2)
2010ए.सी. मिलान (उधार)
2013पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.10(0)
एकूण523(97)
राष्ट्रीय संघ
1996–2009इंग्लंड115(17)
* क्लब पातळीवरील सामने व गोल.
† खेळलेले सामने (गोल).

डेव्हिड बेकहॅम (इंग्लिश: David Beckham; २ मे १९७५) हा एक निवृत्त इंग्लिश फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००९ दरम्यान इंग्लंड राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला बेकहॅम जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. बेकहॅमने १९९२ साली वयाच्या १७व्या वर्षी मॅंचेस्टर युनायटेड ह्या क्लबासोबत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या काळात मॅंचेस्टर युनायटेडने सहा वेळा प्रीमियर लीग, दोन वेळा एफ.ए. चषक तर १९९९ साली युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली. २००३ ते २००७ दरम्यान ला लीगामधील रेआल माद्रिदसाठी चार वर्षे खेळल्यानंतर बेकहॅमने २००७ साली अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमध्ये खेळणाऱ्या लॉस एंजेल्समधील लॉस एंजेल्स गॅलेक्सी ह्या क्लबासोबत करार केला. २०१३ साली पॅरिसमधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. सोबत एक वर्षे खेळल्यानंतर १८ मे २०१३ रोजी बेकहॅमने निवृत्ती जाहीर केली.

बेकहॅमने १ सप्टेंबर १९९६ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तो सहा वर्षे इंग्लंड संघाचा कर्णधार होता. त्याने १९९८, २००२२००६ ह्या तीन फिफा विश्वचषक तसेच २०००२००४ ह्या दोन युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल व गायिका व्हिक्टोरिया बेकहॅम ही डेव्हिड बेकहॅमची पत्नी आहे.

बाह्य दुवे