डेलावेर
| डेलावेर Delaware | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | डोव्हर | ||||||||||
| मोठे शहर | विल्मिंग्टन | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ४९वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ६,४५२ किमी² | ||||||||||
| - रुंदी | ४८ किमी | ||||||||||
| - लांबी | १५४ किमी | ||||||||||
| - % पाणी | २१.५ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत ४५वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | १७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | $५०,१५२ | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-DE | ||||||||||
| संकेतस्थळ | delaware.gov | ||||||||||
डेलावेर (इंग्लिश: Delaware;
डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागर व न्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.
मोठी शहरे
- विल्मिंग्टन - ७०,८५१
- डोव्हर - ३६,०४७
गॅलरी
विल्मिंग्टन.
डेलावेरमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
डेलावेर राज्य विधान भवन.
डेलावेरचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
