डेरोल
डेरोल हे भारतातील गुजरात राज्याच्या आणंद जिल्ह्यातील छोटे शहर आहे.
डेरोल रेल्वे स्थानक वडोदरा-दिल्ली रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे.
संस्थान
डेरोल संस्थान ब्रिटिश भारतातील सहाव्या दर्जाचे संस्थान होते. मही कांठा एजन्सीच्या अंमलाखाली असलेल्या या संस्थानावर कोळी जमीनदारांचे राज्य होते. १९०१मध्ये या संस्थानाची वस्ती ८३७ होती. १९०३-४ या वर्षी संस्थानाची करआवक १,८२३ रुपये असून त्यातील ५१३ रुपये वडोदरा संस्थानाला तर ४७ रुपये इडर संस्थानाला खंडणी म्हणून देण्यात आले.