डेबू
| डेबू | |
|---|---|
डेबू (मराठी चित्रपट) | |
| दिग्दर्शन | निलेश जळमकर |
| निर्मिती | प्रा. शत्रुघ्न बिरकड |
| कथा | निलेश जळमकर |
| पटकथा | निलेश जळमकर |
| प्रमुख कलाकार | मोहन जोशी, मधु कांबीकर, अश्विनी एकबोटे आणि रवी पटवर्धन |
| देश | भारत |
| भाषा | मराठी |
| प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
डेबू हा गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट आहे. गाडगे महाराजांचे मूळ नाव 'डेबू' होते त्यावरूनच या चित्रपटाला हे नाव देण्यात आले. गावातील डेबूचा गाडगे महाराज होतानाचा जीवन प्रवास या चित्रपटात आला आहे.
गरीब समाजतल्या भोळ्या भाबड्या लोकांना दारू, तमाशा, मांसाहार, अंधश्रद्धा ह्यापासून दूर राहण्याचा आणि शिक्षित होऊन श्रीमंत होण्याचा मार्ग महाराज दाखवितात; लोकांसाठी वर्गणी जमा करून घरे बांधून देतात; त्यांच्या पाण्याची सोय करतात; अस्पृश्यता निर्मूलनाचे प्रयत्न करतात. त्यांची ख्याती महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते मंत्रालयापर्यंत पोहचते, हे सर्व या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविलेले आहे.