डेन्मार्क राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये डेन्मार्कचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
१९८९ युरोप महिला क्रिकेट चषकद्वारे डेन्मार्क संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. डेन्मार्क महिला संघाने १९९३ आणि १९९७ या दोन महिला क्रिकेट विश्वचषकांच्या अवृत्त्यांमध्ये भाग घेतला. साल १९९९ नंतर डेन्मार्क महिला संघाचा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा काढून घेण्यात आला.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.