Jump to content

डेक्कन एव्हिएशन

डेक्कन एव्हिएशन ही बंगलोर येथे मुख्यालय असलेली विमानवाहतूक कंपनी आहे. एच.ए.एल. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकतर उड्डाणे करणारी ही कंपनी विमाने तसेच हेलिकॉप्टरे भाड्याने देते.[].

ही कंपनी डिसेंबर ३, इ.स. १९९७ रोजी सुरू झाली.[] त्यानंतर मार्च २००३मध्ये एर डेक्कन या नावाने तिने प्रवासी सेवा पुरवणे सुरू केले. एर डेक्कनला किंगफिशर एरलाइन्सने २००६मध्ये विकत घेतले.

या कंपनीचा डेक्कन लंका या विमानवाहतूक कंपनीमध्ये ४८% हिस्सा आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 72.