Jump to content

डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LIRआप्रविको: MRLB) हा कोस्ता रिकाच्या लायबेरिया शहरातील विमानतळ आहे. देशाच्या वायव्य भागात ग्वानाकास्ते प्रांतातील या विमानतळाला कोस्ता रिकाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅनियेल ओडुबेर क्विरोसचे नाव देण्यात आले आहे.

कोस्ता रिकामधील चार विमानतळांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६ साली येथून ११,४६,१६३ प्रवाशांनी ये-जा केली. यात इतर देशांतून कोस्ता रिकामध्ये येणारे पर्यटकांची संख्या मोठी होती. येथून मध्य आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील लंडनला थेट विमानसेवा उपलब्ध आहे.