Jump to content

डुइसबुर्ग

डुइसबुर्ग
Duisburg
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
डुइसबुर्ग is located in जर्मनी
डुइसबुर्ग
डुइसबुर्ग
डुइसबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°26′6″N 6°45′45″E / 51.43500°N 6.76250°E / 51.43500; 6.76250

देशजर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ २३२.८ चौ. किमी (८९.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,८८,००५
  - घनता २,०९६ /चौ. किमी (५,४३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.duisburg.de


डुइसबुर्ग (जर्मन: Duisburg) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर पश्चिम रूर भागात ऱ्हाईन व रूर नद्यांच्या संगमावर वसले असून ते ड्युसेलडॉर्फ महानगराचा एक भाग आहे. ऐतिहासिक काळापासून लोखंड उत्पादन व्यवसायाचे डुइसबुर्ग हे जर्मनीमधील सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. ह्या कारणास्तव दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून येथे मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले झाले ज्यामध्ये शहराचा ८० टक्के भाग जमीनदोस्त झाला होता.

सध्या सुमारे ४.९ लाख लोकसंख्या असलेले डुइसबुर्ग नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील पाचवे तर जर्मनीमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

खेळ

फुटबॉल हा डुइसबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधे खेळलेला एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग हा संघ इथलाच आहे.

जुळी शहरे

संदर्भ

  1. ^ Brian Daugherty. "Portsmouth Duisburg Anglo-German Friends". Portsmouth-duisburg.tripod.com. 2011-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Duisburger Portsmouthfreunde". Portsmouthfreunde.de. 2011-04-07 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे