Jump to content

डी. रामानायडू

डी. रामानायडू ( इ.स. १९३६ - ) हे दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी प्रामुख्याने तेलुगूसोबत हिंदी, बंगाली, ओरिया, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी आणि भोजपुरी भाषेतील जवळपास १३० चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सर्वाधिक चित्रपट निर्मितीसाठी रामानायडू यांचे नाव गिनेस बुकमध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. २००९ सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

चित्रपट निर्मिती

इ.स. १९३६ साली आंध्र प्रदेशमधील करमचेडू गावात जन्मलेल्या रामानायडू यांनी इ.स. १९६३ साली 'अनुरागम' चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर इ.स. १९६४ साली एन.टी. रामाराव अभिनीत 'रामाडू-भिमाडू' हा त्यांचा चित्रपट दक्षिणेत खूप गाजला. 'सरिगडू' या त्यांच्या चित्रपटाची इ.स. १९९३ साली इंडियन पॅनोरमा विभागात निवड करण्यात आली होती. 'असूख' या त्यांच्या बंगाली चित्रपटाला इ.स. १९९९ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आंध्र प्रदेश सरकारकडूनही त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डी. रामानायडू यांनी निर्माण केलेल्या 'हमारी बेटी' या चित्रपटामध्ये अपंग नायिका सर्वसामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगून आपल्या आयुष्यातील ध्येय कशी पूर्ण करते याचे चित्रण करण्यात आले होते. या चित्रपटाचे शिकागो आणि व्हेनिस येथील महोत्सवांमध्ये प्रदर्शन करण्यात आले होते.

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ माहिती व सूचना मंत्रालय. "Veteran Film Producer Dr. D.Ramanaidu to be Honoured With Dada Saheb Phalke Award for the Year 2009" (इंग्रजी भाषेत). ५ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.