डीव्हीडी
डीव्हीडी (अर्थात डी.व्ही.डी. किंवा "डिजिटल व्हर्सेटाइल डिस्क" किंवा "डिजिटल व्हीडिओ डिस्क"). तबकडीवर प्रकाश किरणांद्वारे माहिती साठवण्याचे हे प्रचलित माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग एखाद्या चलचित्रपटाचे किंवा अन्य माहितीचे मुद्रण करण्यासाठी केला जातो. डी.व्ही.डी.च्या तबकडीचे आकारमान सी.डी. एवढेच असले तरी त्यात सी.डी.च्या तुलनेत ६ ते ११ पट जास्त माहिती साठवता येते.
डिजिटल व्हर्सेटाइल डिस्कचे प्रकार
माहिती संग्रहित करण्याची पद्धत व कालमर्यादा या बाबींवर डीव्हीडीचे प्रकार ठरतात. जसे,
प्रकार | कार्यपद्धती |
---|---|
डीव्हीडी-रॉम | या प्रकारच्या तबकड्यांवर उत्पादनाच्या वेळेसच माहिती लिहिलेली असते व त्यानंतर ती फक्त वाचता/बघता/ऐकता येते. |
डीव्हीडी-आर डीव्हीडी+आर | या प्रकारच्या कोऱ्या तबकड्यांवर कुणालाही फक्त एकदा माहिती लिहिता येते. त्यानंतर या तबकड्या डीव्हीडी-रॉम सारख्या वापरता येतात.(आर म्हणजे रीडिंग) |
डीव्हीडी-आरडब्ल्यू डीव्हीडी+आरडब्ल्यू डीव्हीडी-आर.ए.एम. (आरडब्ल्यू म्हणजे रीडिंग आणि रायटिंग) | या तिन्ही प्रकारात तबकडीवरील माहिती पुनःपुनः लिहिता/वाचता/बघता/ऐकता येते. |
इतिहास
दोन उच्चघनतेच्या प्रकाश किरणाधारित संग्रहण रचनांचे संशोधन १९९३मध्ये चालू होते - एक होती फिलिप्स आणि सोनी या कंपन्यांची मल्टिमीडिया कॉंपॅक्ट डिस्क रचना आणि दुसरी होती तोशिबा, टाइम वॉरनर, मात्सुशिता, हिताची, मित्सुबिशी, पायोनियर, टॉमसन आणि जेव्हीसी या कंपन्यांची सुपर डेन्सिटी (एस.डी.) डिस्क .
विकास
संग्रहण क्षमता
एका डिजिटल व्हर्सेटाइल डिस्कची, माहिती साठवण्याची क्षमता ४.७ गिबा ( गिगाबाइट ) ते ८ गिबा ( गिगाबाइट ) इतकी असते. म्हणजे आपण एकाच डिजिटल व्हर्सेटाइल डिस्कवर ६ ते ११ सिड्यांवर ( कॉम्पॅक्ट डिस्क ) ठेवता येईल इतकी माहिती साठवू शकतो. म्हणजे एका डिजिटल व्हर्सेटाइल डिस्कवर पूर्ण लांबीचे ४ चित्रपट साठवता येतात.
तंत्रज्ञान
डीव्हीडी लिहिण्या वाचण्यासाठी ६५० नॅनोमीटरच्या प्रकाश लहरी वापरल्या जातात. या कंपनसंख्येच्या प्रकाश लहरींचा रंग लाल असतो. संग्रहित माहितीनुसार (चलचित्र, ध्वनी, माहिती) डीव्हीडी लिहिण्याच्या तीन पद्धती आहेत - अर्थात डीव्हीडी-व्हीडियो, डीव्हीडी-ऑडियो आणि डीव्हीडी-डेटा. प्रकाश लहरींद्वारे लिहिल्या जाणाऱ्या पुढच्या पठडीतील ब्लू रे डिस्कसारख्या तबकड्या डी.व्ही.डी. सारख्याच दिसतात म्हणून, हल्ली डीव्हीडीला, एस.डी.-डी.व्ही.डी. (एस.डी. अर्थात स्टॅण्डर्ड) असे म्हणू लागले आहेत.
हे सुद्धा पहा
- कॉम्पॅक्ट डिस्क[मराठी शब्द सुचवा]
- ऑप्टिकल डिस्क[मराठी शब्द सुचवा]