डिसेंबर १६
डिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौदावे शतक
- १३९२ - जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.
पंधरावे शतक
- १४९७ - वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
सतरावे शतक
- १६३९ - इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.
अठरावे शतक
- १७७३ - अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.
एकोणिसावे शतक
- १८३८ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.
विसावे शतक
- १९०३ - मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
- १९२२ - वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.
- १९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज - बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.
- १९४६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४६ - थायलॅंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५७ - ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
- १९७१ - भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
- १९६० - हिमवादळात न्यू यॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.
- १९७१ - बांगलादेश मुक्ति युद्ध - बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.
- १९८५ - कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
- १९८९ - रोमेनियातील क्रांति - हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
- १९९१ - पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
- १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बॉंबफेक केली.
एकविसावे शतक
- २०१२ - दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.
- २०१४ - पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.
जन्म
- १४८५ - अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.
- १७७० - लुडविग फान बीथोव्हेन, जर्मन संगीतज्ञ.
- १७७५ - जेन ऑस्टेन, ब्रिटिश लेखक.
- १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.
- १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९१७ - सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटिश लेखक.
- १९२६ - बबन प्रभू, प्रहसन अभिनेता.
- १९३३ - डॉ. प्रभाकर मांडे, लोकसाहित्याचे अभ्यासक.
- १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.
- १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९६० - चिंतामण गणेश कर्वे, मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक.
- २००० - काशीनाथ सखाराम देवल, मराठी सर्कसमालक.
- २००४ - लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- बहरैन - राष्ट्रीय दिन.
- बांगलादेश - विजय दिन.
- कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.
- दक्षिण आफ्रिका - सामंजस्य दिन (पूर्वीचा शपथ दिन).
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
हे सुद्धा पहा
डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - (डिसेंबर महिना)