Jump to content

डिसेंबर ११


डिसेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

  • १८८२ - सुब्रम्हण्य भारती, तामिळ साहित्यिक 
  • १८९२ - अयोध्या नाथ खोसला, स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ - १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ - १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ - १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६), पद्मविभूषण (१९७७)
  • १८९९ - पु. य. देशपांडे, मराठी कादंबरीकार.
  • १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) .
  • १९१५ - मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक.
  • १९२२ - मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल.
  • १९२५ - राजा मंगळवेढेकर, बालसाहित्यकार
  • १९२९ - सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९३१ - भगवान श्री रजनीश
  • १९३५ - प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
  • १९४२ - आनंद शंकर भारतीयय संगीतकार
  • १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रॅंडमास्टर.

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

बाह्य दुवे




डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - (डिसेंबर महिना)