Jump to content

डिसेंबर १०


डिसेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

  • १९०१ - नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
  • १९१६ - ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९४८ - संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा संमत केला. त्याप्रीत्यर्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
  • १९९८ - अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थतज्ज्ञ प्रा.अमर्त्य सेन यांना प्रदान.
  • २०१४ - भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

  • १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार.औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
  • १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक.भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
  • १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित,संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली..
  • १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.
  • १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
  • १९६० - अभिनेत्री रति अग्निहोत्री

मृत्यू

  • १८९६ - अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
  • १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस.
  • १९५५ - गांधीवादाचे भाष्यकार, 'साधना' साप्ताहिकाचे संपादक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर
  • १९६३ - सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित
  • १९६४ - शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
  • २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता.पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या
  • २००३- श्रीकांत ठाकरे – संगीतकार
  • २००९- दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार 

प्रतिवार्षिक पालन

  • मानव हक्क दिन
  • जागतिक प्राणी हक्क दिन.

बाह्य दुवे


डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - (डिसेंबर महिना)