Jump to content

डिंकाचे लाडू

साहित्य

  • २ वाटया डिंक
  • ३ वाटया सुक्या खोबऱ्याचा कीस
  • २ वाटया खारकाची पूड
  • आर्धी वाटी खसखस
  • १ वाटी कणिक
  • २ वाटया तूप
  • ३ वाटया गूळ किसून
  • १ वाटी पिठीसाखर
  • १ जायफळाची पूड.

कृती

डिंक जाडसर कुटावा, खारका कुटून बारीक पूड करावी. बदाम सोलून पूड अथवा काप करावेत, खसखस गुलाबी रंगावर भाजून तिचा बारीक कूट करावा. कणिक तूपावर खमंग भाजावी, खोबरे किसून भाजून हाताने कुस्करून घ्यावे. कढईत तूप गरम करूल थोडा थोडा डिंक घालून फुलवून तळून घ्यावा. परातीत तळलेला डिंक, खारीक पूड, बदाम काप, कुटलेली खसखस, जायफळ पूड, खोबरे सर्व एकत्र चांगले कालवावे. त्यात तीन वाटया किसलेला गुळ व साखर मिसळावी. फार कोरडे वाटले तर २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व मध्यम आकाराचे लाडू वळावेत. वरील साहित्यात २०-२२ लाडू होतात.

संदर्भ

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo