डावे उग्रवादी
भूमीहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांनकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली.या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना " डाव्या विचरसरणीचे " म्हणून संबोधले जाते.सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.शेतकरी - आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते,पोलीस,लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.