Jump to content

डांगी गाय

शेतीकाम करणारा डांगी बैल
शेतीकाम करणारा डांगी बैल
डांगी गाय


डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिकअहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो.[] यांची दूध देण्याची क्षमता ही जवळपास ६ लिटर (एका वेळेचे) पर्यंत असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे.[] ठाणे जिल्हा देखील जवळ असल्याने त्या भागात देखील या गाई पाहायला मिळतात.

शारीरिक वर्णन

या गोवंशामध्ये संपूर्ण पांढऱ्या रंगावर काळे लहान आकाराचे गोल ठिपके असतात. मस्तक रुंद असून शिंगे लहान, गोलाकार असतात तर डोळे काळे, पाणीदार असतात.

वैशिष्ट्ये

जास्त पावसाच्या प्रदेशात यांची कार्यक्षमता टिकून राहते. यांच्या कातडीवर तेलकट स्त्राव पसरलेला असल्याने पाण्यापासून अपाय होत नाही.[] काटक आणि ताकदवान असल्यामुळे या जातीच्या गायी डोंगरात जाऊन चरतात.[] नाशिक भागात ५०/१०० गायीचे कळप रानात चरायला जाणारे मोठे प्रमाणात पाहायला मिळतात.

वापर

बैल शेतीकामाला पण चालतो. चिखलात देखील गाडी ओढण्याचे काम चांगले करतो. तुकतूकीत कात असल्याने पाणी अंगावर राहत नाही, ओझे वाहण्यासाठी पक्का मेहनतीचा बैल म्ह्णून या गोवंशाची एक वेगळी ओळख आहे.

आढळस्थान

उत्तर महाराष्ट्र

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. 2015-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Dangi". dairyknowledge.in. ३१ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ डॉ. नितीन मार्कंडेय, अमित गद्रे (२००७). देशी गोवंश. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. ४२. ISBN 978-93-86204-44-8.