Jump to content

डग्लस जार्डिन

डग्लस जार्डिन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावडग्लस रॉबर्ट जार्डिन
जन्म२३ ऑक्टोबर १९०० (1900-10-23)
मलबार हिल, बॉम्बे, बॉम्बे प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारत (सद्य भारत)
मृत्यु

१८ जून, १९५८ (वय ५७)

मॉट्रेक्स, स्वित्झर्लंड
विशेषताफलंदाजी
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९२०–१९२३ ऑक्सफर्ड विद्यापीठ
१९२१–१९३३ सरे
१९२५–१९३३/३४ एम.सी.सी.
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने २२ २६२
धावा १२९६ १४,८४८
फलंदाजीची सरासरी ४८.०० ४६.८३
शतके/अर्धशतके १/१० ३५/७२
सर्वोच्च धावसंख्या १२७ २१४
चेंडू २५८२
बळी ४८
गोलंदाजीची सरासरी n/a ३१.१०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/१० ६/२८
झेल/यष्टीचीत २६/० १८८/०

१७ मे, इ.स. २००८
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


डग्लस रॉबर्ट जार्डिन (ऑक्टोबर २३, इ.स. १९०० - जून १८, इ.स. १९५८) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. जार्डिन इंग्लंडकडून २२ कसोटी सामने खेळला. पैकी १९३१ ते १९३४ दरम्यानच्या १५ सामन्यात हा इंग्लंडचा संघनायकही होता. संघनायक म्हणून जार्डिन पंधरापैकी नऊ सामने जिंकला, एक हरला तर पाच सामने अनिर्णित राहिले.

बॉडीलाइन

जार्डिन १९३२-३३ च्या ॲशेस दौऱ्यावर असताना त्याने आपल्या जलद गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यष्टींऐवजी अंगावर मारा करण्याची सूचना दिली. असे करण्यासाठी त्याने बॉडीलाइन नावाने प्रसिद्ध झालेली व्यूहरचना आखली. यासाठी जार्डिन फलंदाजाच्या लेग साइडला तीन ते सहा क्षेत्ररक्षकांचा सापळा लावायचा. यानंतर गोलंदाज राउंड द विकेट येत तुफान वेगाचा चेंडू लेग स्टंप किंवा त्याबाहेर आखूड टप्प्यावर टाकत असे. उसळी घेत अंगावर किंवा डोक्याकडे येणारा हा चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाकडे तीनच उपाय होते. वेळीच खाली बसत/वाकत चेंडू यष्टीरक्षकाकडे जाऊ देणे, अंगा किंवा तोंडासमोर बॅट धरणे व लेगसाइडला टपलेल्या क्षेत्ररक्षकांना सोपा झेल देणे किंवा चेंडू हूक करणे व अंगा/तोंडावर चेंडूचा मार खाण्याचा प्रसंग उभा करणे. त्याकाळी खेळाडूंकडे शिरस्त्राण किंवा इतर बचावात्मक उपकरणे उपलब्ध नसल्याने असे चेंडू घातक होते. डॉन ब्रॅडमनसह जवळजवळ सगळ्या खेळाडूंना हा मारा असह्य झाला आणि इंग्लंडने ही मालिका जिंकली परंतु यानंतर इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट खेळाडू तसेच जनतेतही आपसांबद्दल आकस निर्माण झाला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.