डखाउची छळछावणी
डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौताम्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकिय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री बनवायला लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे काम करण्यास सक्षम होते अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या चेंबरमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.