Jump to content

ट्रॅम

ट्रॅम (इंग्लिश:Tram) हे विजेवर चालणारे वाहन आहे. या साठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू शकते. तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी मुंबई येथे ट्रॅम सेवा होती. तसेच कलकत्ता येथेही ट्रॅम धावत असत. युरोप मधले अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियातील काही शहरे येथे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. शेजारील चित्रात मेलबर्न शहरातील रस्त्यात इतर वाहतूकी सोबत ट्रॅम दिसत आहे.

जूनी ट्रॅम
नवीन ट्रॅम
नवीन ट्रॅम


मुंबईची ट्राम

ट्रामसेवा ही मुंबई शहरातील पहिली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.मुंबईत १९ मे १८७४ रोजी पहिली ट्रामसेवा चालू झाली.मुंबई ट्रामवे कंपनी, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई सरकार ह्यांच्यात करार होऊन तिचे नियोजन झाले. सुरुवातीला ट्रामगाड्या घोडे ओढत असत. नंतर त्या वीजेवर चालविण्यात आल्या. मुंबई वीज पुरवठा आणि ट्रामवेज कंपनी मर्यादित ने मुंबई ट्रामवेज कंपनी विकत घेतली. हीच आताच्या 'बेस्ट'ची मूळ कंपनी.७ मे १९०७ रोजी पहिली विजेवरची ट्राम धावली.१९२० साली दुमजली ट्रामसेवा चालू झाली.१९२४ पासून रेल्वे वीजेवर चालू लागली.१९२६ साली बससेवा चालू झाली.बस व रेल्वे सेवा जलद गतीने असल्याने ट्रामसेवा तोट्यात गेली. शेवटी ट्रामसेवा बंद करण्यात आली.३१ मार्च १९६४ रोजी रात्री १० वाजता बोरिबंदर ते दादर शेवटची ट्रामगाडी धावली.त्या शेवटच्या दिवशी हजारो मुंबईकरांनी तिला दुतर्फा प्रचंड गर्दी करून हळहळत निरोप दिला.त्या दिवशी ७१९४७ प्रवाश्यांनी ट्राममधून प्रवास केला. त्याचे उत्पन्न ४२६० रुपये होते. सुरुवातीला एक आण्यात कुठेही प्रवास करायची सुविधा होती. नंतर दीड आणा आणि नंतर दोन आणे तिकीट झाले. माटुंगा सर्वात दूरचे स्थानक होते. सहा नंबरची ट्रामगाडी फोरासमार्गे कुलाबा ते गिरगाव धावायची.चालकाजवळ पायापाशी वर्दी देण्यासाठी घंटा असायची. ससून डॉक ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वाडीबंदर, लालबाग, जेकब सर्कल, ताडदेव,अॉपेरा हाऊस, ग्रॅंटरोड ते जेजे हॉस्पिटल,धोबीतलाव ते कर्नाकबंदर असे शहरभर जाळे होते.ट्राम गोल फिरून वळायची आणि उलट दिशेने धावायची. आताच्या गोलाकार बागा ह्या तेव्हाची ट्रामची स्थानके होती. किंग्ज सर्कल, सायन सर्कल, दादर टीटी ट्राम टर्मिनस ही त्यातील काही ठिकाणे. बा.सी.मर्ढेकरांच्या खालील शब्दात ती अजरामर झाली. "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा, खडखडते अन् ट्राम वाकडी, कंबर मोडुनी, चाटित तारा"


संदर्भ

महाराष्ट्र टाईम्स मुंबई टाईम्स ०९/१२/२०१९.

बाह्य दुवे

  • Calcutta Tramways Company Calcutta (IND)

Cable car line (US/NY)