Jump to content

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

साहित्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे मूळ संपूर्ण नाव न वापरता वेगळ्याच नावाने साहित्य निर्मितीत वापरलेल्या नावाला टोपण नाव म्हणतात. मराठीले अनेक लेखक टोपणनावाने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

  • अरुण टिकेकर : (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
  • अनिल बाबुराव गव्हाणे : (बापू)
  • अशोक जैन : (कलंदर)
  • अशोक रानडे (दक्षकर्ण)
  • आत्माराम नीलकंठ साधले : आनंद साधले, दमयंती सरपटवार
  • आत्माराम शेट्ये : (शेषन कार्तिक)
  • आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
  • आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
  • आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
  • कृष्ण गंगाधर दीक्षित : (संजीव)
  • कृष्णाजी अनंत एकबोटे (सहकरी कृष्ण)
  • कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
  • कृ.श्री. अर्जुनवाडकर (पंतोजी)
  • केशव नारायण देव : (पतितपावनदास)
  • डॉ.कैलास रायभान दौंड (कैलास दौंड)
  • गंगाधर कुलकर्णी (रसगंगाधर)
  • गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
  • गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
  • गणेश वामन गोगटे : (लीला)
  • गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
  • ग.दि. माडगुळकर (गदिमा)
  • गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
  • गोपाळ नरहर नातू : लोककवी (मनमोहन); मीनाक्षी दादरकर
  • गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
  • चंद्रकांत सखाराम चव्हाण : (बाबूराव अर्नाळकर)
  • चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
  • चिंतामण रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे वडील : (दूत)
  • चिं.त्र्य.खानोलकर - आरती प्रभु या नावाने काव्यलेखन व चिं.त्र्य.खानोलकर या नावाने गद्यलेखन
  • जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
  • तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
  • तुळसी परब : ओज पर्व
  • दगडू मारुती पवार : कथालेखक (जागल्या)
  • दत्ता टोळ : (अमरेंद्र दत्त)
  • दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
  • दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
  • डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
  • दासोपंत दिगंबर देशपांडे : (दासोपंत)
  • दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
  • देवदत्त टिळक : (लक्ष्मीनंदन)
  • द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
  • द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
  • धनंजय चिंचोलीकर : (बब्रूवान रुद्रकंठावार)
  • न.र. फाटक : (अंतर्भेदी), (करिष्मा), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
  • नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्‍मानंद)
  • नागावकर : (गंधर्व)
  • नागेश गणेश नवरे : (नागेश)
  • नारायण गजानन आठवले : (राजा ठकार)
  • नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
  • नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
  • नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
  • नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत (की विनायकसुत?)
  • परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
  • प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
  • पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
  • पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
  • पुरुषोत्तम धाक्रस (फडकरी)
  • पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी : पृथ्वीगीर हरिगीर
  • प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
  • प्र.न. जोशी : (पुष्पदंत)
  • प्रभाकर जनार्दन दातार : शाहीर प्रभाकर
  • प्रभाकर नारायण पाध्ये : (भाऊ पाध्ये)
  • प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
  • फोंडूशास्त्री करंडे : द्विरेफ
  • बशीर मोमीन (कवठेकर): (मोमीन कवठेकर)
  • बळवंत जनार्दन करंदीकर : (रमाकांत)
  • बा.सी. मर्ढेकर : (मकरंद)
  • बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
  • बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
  • ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर : (श्रीधर)
  • भागवत वना नेमाडे : (भालचंद्र नेमाडे)
  • भा.रा. भागवत : (संप्रस्त)
  • मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
  • महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
  • महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
  • मा.गो. वैद्य : (नीरद)
  • महादेव आसाराम घाटेवाळ : (माधव परदेशी)
  • माधव दादाजी मोडक : (बंधु माधव)
  • मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
  • मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
  • मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
  • मुक्ता विठ्ठल कुलकर्णी : (मुक्ताबाई)
  • मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड : (सुमेध वडावाला)
  • मृदुला तांबे : (सृष्टिलावण्या)
  • मेहबूब पठाण : (अमर शेख)
  • मो.ग. रांगणेकर : (धुंडिराज)
  • र.गो. सरदेसाई : (र.गो.स., हरिविवेक)
  • रघुनाथ चंदावरकर : (रघुनाथ पंडित)
  • रघुवीर जगन्नाथ सामंत (कुमार रघुवीर)
  • रविन थत्ते : (रविन मायदेव थत्ते)
  • रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
  • राम गणेश गडकरी : (बाळकराम)
  • रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
  • रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
  • रामचंद्र विनायक कुलकर्णी : (आनंदघनराम)
  • रामचंद्र विनायक टिकेकर - अरुण टिकेकर यांचे आजोबा : (धनुर्धारी)
  • रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
  • रा.श्री. जोग : (निशिगंध)
  • लक्ष्मीकांत तांबोळी : (लता जिंतूरकर)
  • लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत)
  • लीला भागवत : (भानुदास रोहेकर)
  • वा.रा.कांत : (कांत)
  • विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
  • विनायक गजानन कानिटकर : (रा. म. शास्त्री, ग्यानबा)
  • विनायक नरहरी भावे : (विनोबा)
  • वि.ल. बर्वे : (आनंद)
  • वि.शा. काळे  : (बाबुलनाथ)
  • विश्वनाथ वामन बापट : (वसंत बापट
  • विष्णू भिकाजी गोखले : (विष्णूबाबा ब्रह्मचारी)
  • विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज )
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर : (गोल्या घुबड)
  • वि.ह. कुलकर्णी (चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास)
  • वीरसेन आनंद कदम : (बाबा कदम)
  • शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
  • शिवराम महादेव गोऱ्हे : (चंद्रशेखर; चंद्रिका)
  • श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
  • श्रीपाद रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे काका : मुसाफिर
  • स.अ. शुक्ल : (कुमुद)
  • संजीवनी मराठे (जीवन
  • संगीता उत्तम धायगुडे (हुमान कार)
  • सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
  • संतोष दौंडे (संतोष मधुकर दौंडे)
  • सुनंदा बलराम कुलकर्णी : (सानिया)
  • सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
  • सेतुमाधव पगडी : (कृष्णकुमार)
  • पी. विठ्ठल
  • ज्ञानेश्वर नाडकर्णी : (तुकाराम शेंदाणे)
  • (?) अप्पा बळवंत
  • (?) (वामनसुता)
  • (?) (देशभगिनी)
  • (?) (लक्ष्मीतनया)

कवी

मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवी-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. (अपवाद - सौमित्र)

काही मराठी आणि अन्य कवी/लेखकांच्या टोपणनावांची ही यादी :

टोपण नावखरे नाव
अकिंचनवासू. ग. मेहेंदळे
अनंततनयदत्तात्रेय अनंत आपटे
अनंतफंदीअनंत भवानीबावा घोलप
अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबाविठ्ठल अनंत पिंपळगावकर
आनंद साधलेआत्माराम नीलकंठ साधले; दमयंती सरपटवार
अनिलआत्माराम रावजी देशपांडे
अनिल भारतीशान्ताराम पाटील (या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)
अशोक (कवी)नारायण रामचंद्र मोरे
अज्ञातवासीदिनकर गंगाधर केळकर
आधुनिकनीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंदविनायक लक्ष्मण बरवे
आनंदतनयगोपाळ आनंदराव देशपांडे
आरती प्रभूचिंतामण त्र्यंबक खानोलकर
इंदिराइंदिरा संत
इंदुकांतदिनकर नानाजी शिंदे
उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/उद्धव xxxx कोकिळ
एकनाथ, एकाजनार्दनएकनाथ सूर्यनारायण पैठणकर
एक मित्र, विनायकविनायक जनार्दन करंदीकर
कलापी, बालकवीत्र्यंबक बापूजी ठोंबरे
कबीर[[]]
कवीश्वरबासभानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर
कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठलविठ्ठल अनंत पिंपळगावकर
कांतवा.रा. कांत
काव्यविहारीधोंडो वासुदेव गद्रे
काव्यशेखरभास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमरकृष्णाजी लक्ष्मण सोमण
कवी कुंजविहारीहरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधवस.अ. शुक्ल
कुसुमाग्रजविष्णू वामन शिरवाडकर
कृष्णकेशवअनुपलब्ध
कृष्णाग्रजअनुपलब्ध
केशवकुमारप्रल्हाद केशव अत्रे
केशवसुतकृष्णाजी केशव दामले
केशवसुतनारायण केशव बेहेरे
के.स.रि.केशव सदाशिव रिसबूड
कोणीतरीनरहर शंकर रहाळकर
गिरीशशंकर केशव कानेटकर
गोपिकातनयाकु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)
गोपीनाथगोपीनाथ तळवलकर
गोमा गणेशगणेश कृष्ण फाटक
गोविंदगोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंदपौत्रश्रीधर व्यंकटेश केतकर
गोविंदप्रभुगुंडम अनंतनायक राऊळ
गोविंदाग्रजराम गणेश गडकरी
ग्यानबा, रा. म.शास्त्रीवि.ग. कानिटकर
ग्रेसमाणिक गोडघाटे
चक्रधरश्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखरचंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
चेतोहरपरशुराम नारायण पाटणकर
जगन्नाथजगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्ररेव्हरंड नारायण वामन टिळक
जननीजनकजपु.पां गोखले
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वतीवासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथसखाराम केरसुणे
तुकाराम/तुकातुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
तुलसीदास[[]]
दत्तदत्तात्रय कोंडो घाटे
दमयंती सरपटवारआनंद साधले, [[आत्माराम नीलकंठ साधले]
दया पवारदगडू पवार
दामोदरवीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दा.ग.पा.दामोदर गणेश पाध्ये
दासोपंत/ दिगंबरानुचरदासो दिगंबर देशपांडे
दित्जू/माधव जूलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
नामदेवनामदेव दामाशेटी शिंपी
नारायणसुतश्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजनवसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंधरा.श्री. जोग
निळोबानिळा मुकुंद पिंपळनेरकर
नीरजानीरजा साठे
नृसिंहसरस्वतीनरहरी माधव काळे
पठ्ठे बापूरावश्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पद्मविहारीरघुनाथ गणेश जोशी
पद्मापद्मा गोळे
पी.सावळारामनिवृत्तिनाथ रावजी पाटील
पुरु.शिव. रेगेपु.शि. रेगे
पूर्णदासबाबा उपसकर-राजाध्यक्ष
प्रभाकरशाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथभगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाईबहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाईकु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुतज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
बाबा आमटेमुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथविनायक श्यामराव काळे
बालकवी/कलापित्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळाबाळा कारंजकर
बी ; Bबाळकृष्ण अनंत भिडे
बी; BEEनारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारीभगवान रघुनाथ कुळकर्णी
बोधलेबुवामाणकोजी भानजी जगताप
भगवानकविभवान रत्नाकर कऱ्हाडकर
भानजीभास्कर त्रिंबक देशपांडे
भानुदास/मामळूभटभानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्मपांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भावशर्माके.(केशव) नारायण काळे
भालेंदुभालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर
भ्रमर/किरातकृष्णाजी लक्ष्मण सोमण
मंदारएकनाथ पांडुरंग रेंदाळकर
मध्वमुनीश्वरत्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मनमोहनगोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
मनोहरबंधूभास्कर कृष्ण उजगरे
महिपतीमहिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
महीपतिनाथ/ढोलीबुवासखाराम केरसुणे
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबामाणिक मनोहर नाईक, हरकुडे
माधवमाधव केशव काटदरे
माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
माधव मिलिंदकॅ. मा.कृ. शिंदे
माधवसुतदामोदर माधव कुळकर्णी
माधवानुजकाशीनाथ हरी मोडक
मार्क ट्वेनसॅम्युएल लॅंगहाॅर्न क्लेमन्स
मीरामीरा तारळेकर
मीराबाई[[]]
मुकुंदराज?
मुकुंदरायमुकुंद गणेश मिरजकर
मुक्ताबाई/मुक्ताईमुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तिबोधशरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वरमुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंतमोरेश्वर रामचंद्र पराडकर
यशवंतयशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरायशोधरा साठे
योगेशभालजी पेंढारकर
रंगनाथस्वामी(निगडीकर)रंगनाथ बोपाजी घोडके
रघुनाथ पंडितरघुनाथपंडित चंदावरकर/तंजावरकर; रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे
रमेशबाळबाळ सीताराम मर्ढेकर
राजहंसयादव शंकर वावीकर
रा. देव[[]]
राधारमणकृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविरायराम जनार्दन जोशी
रामदासनारायण सूर्याजी ठोसर
रा. म. शास्त्री, ग्यानबावि.ग. कानिटकर
वसंतवासुदेव बळवंत पटवर्धन
डॉ. वसंत अवसरेशांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)
वसंतविहारशंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ.वामन दाजी ओक
वामन पंडितवामन तानाजी शेषे / वा शेष
विठाबाईविठा रामप्पा नायक
विठा रेणुकानंदनविठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
विठ्ठल केरीकरविठ्ठल नरसिंह साखळकर
विठ्ठलदासविठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विंदा करंदीकरगोविंद विनायक करंदीकर
विनायक/एक मित्रविनायक जनार्दन करंदीकर
विष्णूदासकृष्णराव रावजी धांदरफळे
विसोबा खेचरविसोबा चाटे
विहंगमबाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाखत्र्यं.वि. देशमुख
शारदाश्रमवासीपुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शुभानंत[[]]
श्रीकांत[[]]
श्रीकृष्णश्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधरश्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीरामश्रीनिवास रामचंद्र बोबडे
संजीवकृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनीसंजीवनी मराठे
सदानंदस्वामीसदानंद चिंतामणी उपासनी
सरस्वतीकंठाभरणदिनकर नानाजी शिंदे
साधुदासगोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सानियासुनंदा बलराम कुलकर्णी
साने गुरुजीपांडुरंग सदाशिव साने
सामराजशामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
सांवतामाळीसांवता परसूबा माळी
सुधांशुहणमंत नरहर जोशी
सुमंतअप्पाराव धुंडिराज मुरतुले
सुहृद्चंपापुरुषोत्तम शिवराम रेगे
सौमित्रकिशोर कदम
स्वरूपानंदरामचंद्र विष्णू गोडबोले
हरिबुवाहरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
हरिहरमहाराज/उदासीनीलकंठ रामकृष्ण पाळंदे
प्रीतस्वप्नील चाफेकर
मानसी सरोजनम्रता माळी पाटील
होनाजीहोनाजी सयाजी शेलारखाने
ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत[[ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी]

हे सुद्धा पहा