Jump to content

टोपणनावानुसार मराठी लेखक

टोपण नावखरे नाव
अंतर्भेदी/फरिश्ता/सत्यान्वेषीन.र. फाटक
अनंत फंदीअनंत भवानीबावा घोलप
अनिलआत्माराम रावजी देशपांडे
अनिल विश्वासगणपती वासुदेव बेहेरे
(बापु), (शेती मातीचे कवी)अनिल बाबुराव गव्हाणे
ग्रेसमाणिक सीताराम गोडघाटे
अनिरुद्ध पुनर्वसूनारायण आठवले
अप्रबुद्धविष्णू केशव पालेकर
आनंद पुणेकरमुकुंद टाकसाळे
आनंदीआनंदमुकुंद टाकसाळे
एक हिंदूतुकाराम तात्या पडवळ
एका जनार्दनएकनाथ
ओज पर्वतुळसी परब
ओम स्वरूपबालाजी तांबे
कण्टकार्जुनकृ.श्री. अर्जुनवाडकर
कलंदरअशोक जैन
काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथीकृष्णाजी लक्ष्मण सोमण
किरात/धनुर्धारी/राघवानंदरामचंद्र विनायक टिकेकर
अण्णाभाऊ साठेतुकाराम भाऊराव साठे
कुसुमाग्रजविष्णू वामन शिरवाडकर
केयूरकविठ्ठल वामन हडप
केवलानंद सरस्वतीनारायण सदाशिव मराठे
केशवकुमारप्रल्हाद केशव अत्रे
केशवसुतकृष्णाजी केशव दामले
केशवस्वामीकेशव आत्माराम कुलकर्णी
कोणीतरीनरहर शंकर रहाळकर
गुळवणीअप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर
गोपाळ शिवरामगोपाळ शिवराम लागवणकर
गोपिकातनया/जीजीमनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर
ग्यानबा, रा. म. शास्त्रीवि.ग. कानिटकर
चकोर/चिकित्सक/निरीक्षकपुरुषोत्तम मंगेश लाड
चंद्रगुप्तवि.सी. गुर्जर
चारुता सागरदिनकर दत्तात्रेय भोसले
जातिहृदयनारायण दामोदर सावरकर
टप्पू सुलतानमुकुंद टाकसाळे
ठणठणपाळजयवंत दळवी
तंबी दुराईश्रीकांत बोजेवार
तुकडोजी/तुकड्यादासमाणिक बंडोजी इंगळे
दमयंती सरपटवारआनंद साधले
दासगणूगणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे
दादूमियादामोदर विष्णू नेने
द्विरेफफोंडूशास्त्री करंडे
धनुर्धारी/राघवानंद/किरातरामचंद्र विनायक टिकेकर
नाथमाधवद्वारकानाथ माधव पितळे
नाना वांद्रेकरनारायण आठवले
नारायण महाराजनारायण आठवले
निरीक्षक/चकोर/चिकित्सकपुरुषोत्तम मंगेश लाड
फकीरदास फटकळनारायण आठवले
नारायण दाजीनारायण दाजी लाड
निषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकरमं.वि. राजाध्यक्ष
पंडिता रमाबाईरमाबाई विपिन मेघावी
पंतोजीकृ.श्री. अर्जुनवाडकर
पिनाकि/भ्रमर/शंकरशंकर दाजीशास्त्री पदे
पुरुषराज अलुरपांडे/निषाद/स.ह.वासकरमं.वि. राजाध्यक्ष
पूर्वा नगरकरनारायण आठवले
फरिश्ता/सत्यान्वेषी/अंतर्भेदीनरहर रघुनाथ फाटक
बाप रखुमाईवरज्ञानेश्वर
बाबा पदमनजीबा.व. मुळे
बाबारावगणेश दामोदर सावरकर
बाबुराव अर्नाळकरचंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबू मोशायहेमंत देसाई
बाळकरामराम गणेश गडकरी
श्रइसाक मुजावर
बी Bबाळकृष्ण अनंत भिडे
ब्रिटिश नंदीप्रवीण टोकेकर
भाऊ महाजनगोविंद विठ्ठल महाजन
भारताचार्यचिंतामण विनायक वैद्य
भारद्वाजशिवराम एकनाथ भारदे
भालाकारभास्करराव बळवंत भोपटकर
भालेंदूभालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकर
भावगुप्त पद्मपांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भ्रमर/शंकर/पिनाकिशंकर दाजीशास्त्री पदे
भ्रमर/मधुकर/सारथी/काळदंड/किरातकृष्णाजी लक्ष्मण सोमण
मजेतपद्मजा फाटक
मनमोहनमनमोहन नातू (गोपाळ नरहर नातू)
मदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकरइसाक मुजावर
महाराष्ट्रीयपरशराम गोविंद चिंचाळकर
मुकुंदरायमुकुंद गणेश मिरजकर
रंगनाथस्वामीरंगनाथ बोपजी कुलकर्णी
राघवानंद/किरात/धनुर्धारीरामचंद्र विनायक टिकेकर
राधारमणकृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजी गणोजीरामजी गणोजी चौगुले
रा. म. शास्त्री, ग्यानबावि.ग. कानिटकर
रियासतकारगोविंद सखाराम सरदेसाई
रेठरेकरश्रीधर कृष्ण कुलकर्णी
लोकहितवादी[गो.ह. देशमुख]]
विजयराजेडॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे
विद्यानंददामोदर केशव पांडे
विभावरी शिरूरकर, श्रद्धा, बी.के.,कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरेमालती बेडेकर
वि.रा. भाटकरद.मा. मिरासदार
विरूपाक्षसंभाजी कदम
वीर वामनराव जोशीवामन गोपाळ जोशी
शंकर/पिनाकि/भ्रमरशंकर दाजीशास्त्री पदे
शमादत्तात्रेय गणेश गोडसे
शशिकांत पुनर्वसूमोरेश्वर शंकर भडभडे
शांतारामके.ज. पुरोहित
शांतारामशांताराम विठ्ठल मांजरेकर
शारदाश्रमवासीपुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शारदाश्रमवासीविठ्ठल जिवाजी नाडकर्णी
श्रीदादाभाईमंगेश रामचंद्र टाकी
श्रीभाईरामचंद्र शंकर टाकी
सच्चिदानंदमहादेव मल्हार जोशी
सखाराम अर्जुनसखाराम अर्जुन राऊत
सख्या हरीदत्तू बांदेकर
सख्या हरीनारायण आठवले
संजयमाधव पंढरीनाथ शिखरे
सत्यान्वेषी/फरिश्ता/अंतर्भेदीनरहर रघुनाथ फाटक
संदेशअच्युत बळवंत कोल्हटकर
समर्थरामदास
सवाई नाटकीराम गणेश गडकरी
सहकारी कृष्णकृष्णाजी अनंत एकबोटे
स.ह. वासकर/निषाद/पुरुषराज अलुरपांडेमं.वि. राजाध्यक्ष
साधुदासगोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सारथी/काळदंड/किरात/भ्रमर/मधुकरकृष्णाजी लक्ष्मण सोमण
सुमेध वडावालामृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड
सृष्टिलावण्यामृदुला तांबे
स्वरूपानंदरामचंद्र विष्णू गोडबोले
स्वामी सच्चिदानंदमहादेव मल्हार जोशी
स्वामी समर्थ????
हंसबाळकृष्ण मल्हार बीडकर
अनुतनयचंद्रकांत काशिनाथ निकाडे


लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता. आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, ओवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफत असत त्यालाच उर्दूमध्ये मक्ता असे म्हणतात.

' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥ ' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥' ' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥' ' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्धाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥' 'आठवुणी हैदर गुरुजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥' संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते. मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला आस्तेआस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरुवात झाली. आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरुवात झाली. या नावालाच टोपणनाव असे म्हणतात. हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.

  • अगदी सुरुवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे. उदा. तुका, जनी, नामा, ज्ञानदेव
  • पुढच्या काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
  • स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरुण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वतःला सुरक्षित ठेवून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
  • आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला. उदा. आठवुणी हैदर गुरुजींला, एका जनार्दनी, बाप रखुमाईवरा
  • काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते. उदा. अनुतनय, चंद्रकुमार, कुसुमाग्रज, केशवसुत, गोविंदाग्रज, रत्नाकर
  • काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी त्या व्यक्ती मूळ नावाशी दुरान्वयेही संबंध नसणारे टोपणनाव घेतात.
  • तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःचे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन ते त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावतात.
  • कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
  • काही संपादक संकुचित वृत्तीने ठरावीक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी, त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
  • विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
  • ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
  • काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
  • स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरुषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रुजविले आहे.

हे सुद्धा पहा

  • टोपणनावानुसार मराठी साहित्यिक
  • टोपणनावानुसार मराठी कवी
  • टोपणनावानुसार मराठी नाटककार