टेसी थॉमस
टेसी थॉमस (जन्म-एप्रिल १९६३) या भारतीय शास्त्रज्ञ भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५०० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यांना भारताची 'मिसाइल वुमन' म्हणून ओळखले जाते.ह्या अग्नी -४ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील ३,००० किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर जाऊन आदळले.[१][२]
सुरुवातीचे जीवन
थॉमस यांचा जन्म एप्रिल १९६३ मध्ये केरळमधील अलाप्पुझा येथे सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला.त्यांना मदर टेरेसा (टेरेस किंवा टेरेसियाचे) म्हणून नाव देण्यात आले.त्यांचे वडील एक आयएफएस अधिकारी तसेच एक उद्योगपती आणि एक अकाऊंट म्हणून काम करत होते.जेव्हा थॉमस १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील पक्षाघाताने त्रस्त होते. त्यामुळे त्यांचा उजवा हात काम करत नसे. त्यांची आई शिक्षिका होती आणि अशा परिस्थितीत कुटुंबाची देखभाल करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या थुंबा रॉकेट लॉचिंग स्टेशनजवळ मोठी झाली.तिला रॉकेट व मिसाईल याचा मोह तिला आला.विमानाच्या उद्रेकामुळे तिलाही उत्तेजन मिळाले. थॉमसला चार बहिणी आणि एक भाऊ आहे.एका मुलाखतींमध्ये तिने तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचे योग्य शिक्षण मिळावे याबद्दल मुलाखत दिली. तिच्या दोन बहिणीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.तर भावाने एमबीए करीत आहे.[३]
शिक्षण
टेसी थॉमस यांनी त्यांचे शालेय शिक्षण एसटी.मायकल या शाळेत पूर्ण केले.आणि उच्च माध्यमिक म्हणजेच ११ वी व १२ वीचे शिक्षण ॲलेप्पी (अलप्प्झुहा) मधील एसटी जोसेफ गर्लच्या विद्यालयात पूर्ण केले. त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय खूप आवडायचे.कनिष्ठ महाविद्यालयात असताना त्यांनी गणित विषयात शंभर टक्के गुण मिळवले.त्याच वर्षी त्यांनी शास्त्रामध्ये ही पंच्याण्णव टक्के गुण मिळवले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दरमहा १०० रुपये असे कर्ज घेतले.सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय,थ्रिसूर येथून अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केला. त्या अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यातून त्यांनी ट्युशन फी भरली.त्यांच्या प्रवेशाच्या वेळी गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांत त्यांचा नंबर लागला.कर्जाची परतफेड करण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी आपले B.Techचे शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी बाकीच्या उपक्रमात सुद्धा सहभाग घेतला.त्यांना विशेषतः बॅडमिंटन खेळण्याची आवड होती.[४]
कारकीर्द
१९८८ मध्ये त्या डीआरडीओमध्ये सामील झाल्या.त्यांना डीआरडीओमध्ये डिझाईन विभागामध्ये आणि तसेच नवीन पिढीच्या बैलिस्टिक क्षेपणास्त्राची रचना,अग्नी. या विभागासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नेमणूक केली आहे. टेसी ३,००० किमी लांबीच्या अग्नी-३ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या सहकारी प्रकल्प संचालक होत्या. त्या अग्नि IV मोहिमेसाठी प्रकल्प संचालक होत्या. अग्नी-४ची २०११ मध्ये यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती.टेसी यांची २००९ मध्ये ५००० किलोमीटरच्या अग्नी- ५ प्रकल्पासाठी प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.१९ एप्रिल २०१२ रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "टेसी थॉमस - पहिली भारतीय महिला जिने मिसाईल प्रकल्पावर काम केले". Be An Inspirer (इंग्रजी भाषेत). 2016-12-22. 2018-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-13 रोजी पाहिले.
- ^ "'We watched breathlessly, praying for inner strength as the missile took off'". The Telegraph. 2018-07-13 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Tessy Thomas" (इंग्रजी भाषेत). 2018-07-13 रोजी पाहिले.
- ^ "Malayaly Social Networking Site, Malayalee orkut - People of Kerala, India - GlobalMalayaly.com - www.globalmalayaly.com". 2012-04-22. 2012-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-13 रोजी पाहिले.