टेम्पलटन पुरस्कार
टेंम्पलटन पुरस्कार हा विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार सर जॉन टेम्पलटन या ब्रिटिश उद्योगपती व दानशूर व्यक्तीच्या नावे दिला जातो.
हा पुरस्कार १९७३पासून देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मदर तेरेसा, सर्वपल्ली राधाकृष्णन, बिली ग्रॅहाम, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, दलाई लामा यांसह अनेक व्यक्तींना दिला गेला आहे.