टेंभुर्ली
?टेंभुर्ली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शहापूर |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा मराठी | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५२७ • एमएच/04 |
टेंभुर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. मांजरे ग्रामपंचायतीचे कार्यालय टेंभूर्ली गावात आहे. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. ह्या गावाला जाण्यासाठी दळणवळणाची काही खास सोय नाही. शहापुरहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी न्याहाडी बस टेंभूर्ली गावावरून जाते.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
येथील राहणीमान एकदम साधे आहे.सदरा पायजमा व डोक्यावर गांधी टोपी असा पेहराव, भातशेती हा प्रमुख व्यवसाय असल्याकारणाने भात-भाकरी वरण, भाजी ह्या पदार्थांचा जास्त समावेश असतो.
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
टेंभूर्लीगाव हद्दीत टेंभूर्ली, कातकरीवाडी, चांद्रीचापाडा, तोरणपाडा, पष्टेपाडा, माणगांव ही गावे येतात.टेंभूर्ली गाव शहापूर-मुरबाड तालुक्याच्या सीमारेषेवर आहे. शेजारील गावे बेलवली, मांजरे, मुरबाड तालुक्यातील वेळूक, बुरसुंगे ही गावे आहेत