टी.एम. सेल्वागणपती
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
टी.एम. सेल्वागणपती हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९९१ मध्ये तिरुचेंगोडे मतदारसंघातून निवडून आलेले तामिळनाडू विधानसभेचे सदस्य होते. १९९१ ते १९९६ दरम्यान ते जयललितांच्या सरकारमध्ये स्थानिक प्रशासन मंत्री होते. १९९९-२००४ मध्ये ते सेलम मतदारसंघातून १३ व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. मूळत: ते अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सदस्य होत पण ते ऑगस्ट २००८ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाले.[१] २०२४ मध्ये ते पुन्हा सेलम मधून विजयी ठरले.
२ फेब्रुवारी २००० रोजी प्लेझंट स्टे हॉटेल प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आणि नंतर ४ डिसेंबर २००१ रोजी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कलर टीव्ही घोटाळ्यात ३० मे २००० रोजी ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते आणि नंतर ४ डिसेंबर २००२ रोजी उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.[२][३]
जून २०१० मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. २०१४ मध्ये, त्याला एका आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयाने दोषी ठरवले, परिणामी तो अपात्र ठरला. भ्रष्टाचारासाठी संसदेतून अपात्र ठरलेले ते तामिळनाडूतील पहिले राजकारणी ठरले. [४]
संदर्भ
- ^ "Selvaganapathy joins DMK". The Hindu. 29 August 2008.
- ^ "Colour TV scam: High Court upholds acquittal of Jayalalithaa". Press Trust of India. Chennai: The Hindu. 21 August 2009. 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "Madras HC upholds acquittal of Jayalalitha in TV scam". Zee News. 22 August 2009. 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "First Tamil Nadu politician to be disqualified as MP after conviction". NDTV. 2014-04-17.