टिनटिनच्या साहसकथा
टिनटिनच्या साहसकथा | |
लेखक | एर्जे |
भाषा | मूळ भाषा फ्रेंच |
देश | बेल्जियम |
साहित्य प्रकार | साहसकथा |
प्रकाशन संस्था | कास्टरमन |
टिनटिनच्या साहसकथा (फ्रेंच:Les Aventures de Tintin) ही एक फ्रेंच चित्रकथामाला आहे. बेल्जियन कलाकार एर्जे किंवा जॉर्जस रेमी यांची ही कलाकृती आहे. ही माला ५० भाषांत अनुवादित झालेली आहे. भारतासह जगभर ही मालिका प्रसिद्ध आहे.
कथासूत्र
पात्रे
पात्रांची नावे इंग्रजी आवृत्तीप्रमाणे आहेत.
टिनटिन व स्नोई
कथेचा नायक. बेल्जियन पत्रकार.
स्नोई -फ्रेंच आवृत्तीत नाव मिलु(Milou). टिनटिनचा पाळीव कुत्रा. व्हाईट फॉक्स टेरियर जातीचा कुत्रा.
कॅप्टन हॅडॉक
कॅप्टन आर्चिबाल्ड हॅडॉक, बोटीचा कप्तान. टिनटिनचा जिवलग मित्र. कथेप्रमाणे हा बेल्जियन, स्कॉटिश किंवा फ्रेंच असू शकतो. क्रॅब विथ दी गोल्डन क्लॉज या पुस्तकात प्रथमदर्शन.
याचे नाव (आर्चिबाल्ड) शेवटच्या गोष्टीत उघडकीस आणले आहे.
प्रोफेसर कॅलक्युलस
नेहमी आपल्याच तंद्रीत असलेला व थोडासा बहिरा असा एक भौतिकशास्त्रज्ञ. रेड रॅखम्स ट्रेजर मध्ये प्रथमदर्शन.
काल्पनिक देश व स्थळे
टिनटिनमध्ये अनेक काल्पनिक स्थळे व देश दाखवण्यात आले आहेत.
काल्पनिक देश
सिल्डाव्हिया
युरोपातील देश. बोर्डुरियाचा शेजारी देश.
बोर्डुरिया
युरोपातील देश. सिल्डाव्हियाचा शेजारी देश.
सॅन थिओडोरो
दक्षिण अमेरिकेतील देश.