Jump to content

टिकेलची कस्तुरिका

टिकलीची कस्तुरिका

टिकेलची कस्तुरिका (इंग्लिश:Tickell's thrush; हिंदी:देशी पवई) हा एक पक्षी आहे.

ओळखण

टिकेलची कस्तुरिका ही मध्यम आकाराच्या मैनेयेवढी असते. नर हा राखी रंगाचा आसतो व छाती पिवळट रंगाची असते.पोट पांढरे असते व मादीचा वरील भागाचा वर्ण तपकिरी रंगाचा असतो चोच व भुवई व डोळ्याभोवतालचे कडे पिवळट असतात व कंठ पांढरा असतो. दोन्ही बाजूंना तपकिरी रेषा असतात. छातीवर पिवळसर तपकिरी रुंदी पट्टी असते. पोट व शेपटीखालील भाग पांढरा असतो.

वितरण

वायव्य सरहद्द प्रांतापासून हिमालयात पूर्वेकडे काश्मीर ते नेपाल ,सिक्कीम या भागात उन्हाळ्यात आढळतात तेव्हा त्यांना उन्हाळी पाहुणे म्हणतात कांग्रा ते अरुणाचल प्रदेश,द्वीपकल्पात पूर्व मध्यप्रदेश ओरिसा (मयूरभंज ),ईशान्य आंध्र (अनंतगिरी),तसेच बंगाल,बांगला देश चीतगोंगचा प्रदेश या भागात हिवाळ्यात आढळतात. एप्रिल ते ऑगस्ट या काळात आढळतात.

निवासस्थाने

उन्हाळ्यात पानगळीच्या विरळ जंगलातील गवती कुरणे ,वाळूंजच्या राया ,फळबागा व उद्याने इथे राहतात हिवाळ्यात ते जंगलाच्या सरहद्दी व राया इथे राहतात

टिकलीची कस्तुरिका

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली