टायटॅनिक
१९१२ मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक (इंग्लिश: RMS Titanic) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यू यॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकूण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची २ प्रमुख कारणे होती. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील(संख्या:११७८) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब, टायटॅनिक वरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यू येतो.
टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.
प्रवास
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरू केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासून केवळ ४ मीटर अंतरावरून वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरू केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
प्रवाशी
टायटॅनिक मध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोग प्रवास करत होते. जॉन जेकब अस्तर हे १९०९ मधील सर्वात श्रीमंत दांपत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होते. टायटॅनिक मध्ये सर्वसाधारणपणे १३१७ लोक प्रवास करत होते.
- ३२४ (प्रथम वर्ग)
- २८४ (द्वितीय वर्ग)
- ७०९ (तृतीय वर्ग)
जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते , पूर्ण भरू शकत असलेले टायटॅनिक "नॅशनल कोल"च्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपले आरक्षण रद्द केले होते. टायटॅनिकचे मालक जे.पी.मॉर्गन यांनी त्यांची सवारी शेवटच्या मिनिटाला रद्द केली.
जहाजाची मूळ क्षमता -
- १०३४ (प्रथम वर्ग)
- ५१० (द्वितीय वर्ग)
- १०२२ (तृतीय वर्ग)
अपघात
४ दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४५ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासून ४०० मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिकची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिकच्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिकचा मागील भाग पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.
जास्त मृत्यूमुखींचे कारण
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -
- जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
- टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.
- टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
टायटॅनिक बद्दल आजही माझ्या मनात कायम कुतूहल अन् जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल याची धडपड कायम चालू असते. टायटॅनिक हे फक्त एक जहाज नसुन एक पर्व आहे जे कधीही संपुष्टात येणार नाही. माझ्या सारख्या करोडो चाहत्यांसाठी अन् ऐतिहासिक जहाजेचे योग्य पद्धतीने संवर्धन व्हावे,यासाठी अन् माझ्या माध्यमातून तीची ओळख सर्वदूर पसरली जावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून हा अल्बम मी माझ्या फेसबुक अकाऊंटला क्रिएट केला आहे.आशा करतो की आपण सर्वांनी ही माहिती वाचावी.
लेखन:भरत सोनवणे (औरंगाबाद).
#TitanicinfoBLS
- बीबीसीवरील लेखागार(इंग्रजी)
- टायटॅनिक ऐतिहासिक समिती (इंग्रजी)
हे सुद्धा पहा
टायटॅनिक, चित्रपट