टाटा डोकोमो
टाटा डोकोमो ही एक टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीची भ्रमणध्वनी सेवा आहे. जपानमधील मोठी दुरध्वनी कंपनी डोकोमो समूह (२६% समभाग) व टाटा समूह (७४% समभाग) ह्यांच्यात नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या करारानुसार ते संयुक्तपणे "टाटा डोकोमो" ह्या नावाने भ्रमणध्वनी सेवा पुरवितात.
ही एक जीएसएम सेवा असून ती प्रीपेड आणि पोस्टपेड ह्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सध्या ती भारतातील ११ टेलिकॉम मंडळांमध्ये कार्यरत आहे. ह्या मंडळात दक्षिणेतील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश व तमिळनाडू व उत्तरेकडील हरियाणा, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल ही राज्ये येतात.