टांगानिका
टांगानिका (इ.स. १९६१-६२) टांगानिकाचे प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४) Tanganyika Republic of Tanganyika | ||||
| ||||
| ||||
राजधानी | दार एस सलाम | |||
शासनप्रकार | घटनात्मक राजेशाही (इ.स. १९६१-६२) प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४) | |||
राष्ट्रप्रमुख | राष्ट्रप्रमुख - -इ.स. १९६१-६२ एलिझाबेथ दुसरी -इ.स. १९६२-६४ ज्युलियस न्यरेरे | |||
पंतप्रधान | राज्यपाल - -इ.स. १९६१-६२ रिचार्ड टर्नबुल | |||
अधिकृत भाषा | स्वाहिली इंग्लिश |
टांगानिका (रोमन लिपी: Tanganyika ;), उत्तरकाळातील टांगानिकाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: टांगानिक्याचे प्रजासत्ताक ; इंग्लिश: Republic of Tanganyika, रिपब्लिक ऑफ टांगानिका) हा पूर्व आफ्रिकेतील इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. हिंदी महासागर व व्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या देशात वर्तमान रवांडा, बुरुंडी व झांझिबार वग़ळता टांझानियाच्या उर्वरित भूभागाचा समावेश होता, तर दार एस्सलाम येथे टांगनिक्याची राजधानी होती.. भूतपूर्व जर्मन पूर्व आफ्रिकेच्या वसाहतींना ९ डिसेंबर, इ.स. १९६१ रोजी स्वातंत्र्य मिळून या देशाची स्थापना झाली. २६ एप्रिल, इ.स. १९६४ रोजी या देशाचे विसर्जन झाले व याच्या भूभागात झांझीबाराचे सामिलीकरण होऊन वर्तमान टांझानियाचे प्रजासत्ताक स्थापले गेले.
बाह्य दुवे
- "टांगानिक्याचा इ.स. १८८६ सालाच्या सुमाराचा नकाशा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)