Jump to content

टमटम

६ आसनी रिक्षा / टमटम

टमटम हे महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तसेच काही शहरी / निमशहरी भागात प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन आहे.

हे वाहन ६ आसनी असून रिक्षा सारखे असते. या रिक्षा सहसा डीझेलवर चालतात. डीझेलवर चालणाऱ्या या वाहनांमुळे हवा-प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही शहरी भागात टमटमना प्रवेश निषिद्ध केला गेला आहे.

या रिक्षा ६ आसनी असल्या तरी अनेक वेळा या रिक्षात चालकाशेजारी ३ आणि मागे (४ + ४ समोरासमोर) ८ असे किमान ११ प्रवासी वाहून नेले जातात.

दे धक्का या मराठी चित्रपटात टमटममधील प्रवास पाहावयास मिळतो.