टपालाने मतदान
जेंव्हा एखादा मतदार, कोणत्याही सबळ कारणाने, प्रत्यक्षपणे मतदान करण्यास मतदान केंद्रावर पोहोचू शकत नाही, अशा वेळी टपालाने मतदान करण्याची मुभा दिल्या जाते. मतपत्रिका ह्या निवडणुकीच्या दिवसाआधी पोहोचणे अपेक्षित असल्यामुळे, यास कधी-कधी अप्रत्यक्ष मतदान असेही संबोधण्यात येते.
यासाठी संबंधीत मतदाराकडे कोरी मतपत्रिका ही निवडणुकीच्या पुरेसे दिवसाआधी पोचणे अपेक्षित असते, ज्याद्वारे त्यास आपले मत नोंदवून, ती टपालाने संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविणे शक्य होईल.
इतिहास
सर्वप्रथम याची सुरुवात पश्चिम ऑस्ट्रेलियात इ.स. १८७७ मध्ये झाली.