Jump to content

टकारी समाज

टकारी समाज हा मुळचा आंध्रप्रदेशातील. या समाजाची तेलुगू ही बोलीभाषा. धिप्पाड शरीरयष्टी असणारा हा समाज आंध्रात गोदावरी खोऱ्यात पिढ्यान पिढ्या रहात होता.

१८ शतकाच्या उत्तरार्धात या समाजात स्वराज्य निर्मितीचे वारे वाहू लागले आणि स्वदेशीचा भावनेने हा समाज भारावून गेला. इंग्रजांविरुद्ध दोन हात करायचे तर धन पाहीजे हे धन मिळवण्यासाठी या समाजाने इंग्रजांचा तिजोऱ्या तसेच श्रीमंतांची घरे लुटण्यास सुरुवात केली. स्वराज्यासाठी लढणारे किंवा स्वराज्याचा ध्यास घेतलेले त्याकाळचे जे राजे महाराजे होते त्यांना मदत करण्याचे काम टकारी समाजाने केल्याची इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेला ज्यावेळी सनद कमी पडली त्या वेळी महाराजांनी सुरतेवर छापे टाकले होते. त्याचप्रमाणे याही समाजाने ज्यावेळी धनाची कमतरता वाटली तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांची व धन दाडक्यांची घरे लुटून तोच पैसा स्वातंत्र्याच्या कामासाठी वापरला. टकारी समाजासह इतर भटक्या समाजाचे हे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी सन १८७१ मध्ये खास गुन्हेगारी कायदा करून या समाजाला अटक केली. तेव्हापासून टकारी समाजासह पारधी, मांगगारुडी, रामोशी, वडार, कैकाडी, पामलोर,राजपूत भामटा या जमाती गुन्हेगारी जमाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.टकारी समाज हा गायकवाड आणि जाधव अशा दोन आडनावात तसेच कसकनोरू, पपनोरू, भूमेनोरू. मीनगलोरू या गोत्रामध्ये विभागला गेला आहे. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मघ्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आदि राज्यामध्ये या समाजाची मोठी लोकवस्ती आहे. महाराष्ट्रात विशेष करून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, आदि जिल्हांमध्ये हा समाज विखुरला आहे. पूर्वी स्वातंत्र्यासाठी चोऱ्या करणारा हा समाज स्वातंत्र्यानंतर मात्र उपेक्षित राहिल्याने चोरी करणे, भामटेगिरी करणे हाच या समाजाचा मुख्य व्यवसाय बनून गेला. त्यामुळे आजही या समाजाकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते.

संदर्भ

http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1143 Archived 2018-06-06 at the Wayback Machine.